शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधासाठी विरोध हाच एकमेव अजेंडा : विजया रहाटकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 12:38 IST

जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांचा विरोध केवळ विरोधासाठी आहे

पुणे  - पंतप्रधान मोदींना विरोधासाठी विरोध करणे हा विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे. याखेरीज त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही उरले नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली. कसबा विधानसभा मतदार संघ आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने महायुतीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. आरपीआयच्या राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले, महापौर मुक्ताताई टिळक, भाजपच्या महिला शहर प्रमुख शशिकला मेंगडे, स्वरदा बापट, शिवसेनेच्या नेत्या तृष्णा विश्वासराव , वैशाली नाईक , संगीता आठवले , त्याचप्रमाणे भाजप , शिवसेना,आरपीआय आणि अन्य घटक पक्षाच्या महिला पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. मेळाव्यास महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. विरोधकांकडे धोरण नाही आणि नेता नाही असे स्पष्ट करून रहाटकर म्हणाल्या, जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांचा विरोध केवळ विरोधासाठी आहे. विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही.  म्हणूनच देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे. हे सरकार सक्षम आणि मजबूत असावे यासाठी बहुमताने सरकारला निवडून द्या  केवळ पुण्यात नाही तर राज्यात आणि देशात जास्तीतजास्त जागा आपणास मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयन्त करा. महिलांसाठी सरकारने अनेकविध योजना आणल्या. त्याची माहिती घरोघरी पोचवा, असे त्या म्हणाल्या. आरपीआय नेत्या आठवले म्हणाल्या, समाजातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, अशा विविध घटकासाठी सरकारने योजना आणल्या आहेत त्याची माहिती महिलांनी स्वत: करून घ्यावी आणि इतरांना सांगावी. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून आणा. महापौर टिळक यांनी सांगितले की , गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने केवळ महिला सक्षमीकरणासाठी योजना आणल्या नाहीत तर जगात देशाची प्रतिष्ठा उंचावली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारला आपणाला संधी  द्यायची आहे. 

टॅग्स :PuneपुणेVijaya Rahatkarविजया रहाटकरBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी