शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

फक्त २१४ विंधनविहिरी यशस्वी

By admin | Updated: June 23, 2016 02:22 IST

पाणीटंचाईच्या काळात दरवर्षी जिल्ह्यात हातपंप घेण्याचा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही सहा भूवैज्ञानिकांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. मात्र, हातपंपासाठी साईटच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

पुणे : पाणीटंचाईच्या काळात दरवर्षी जिल्ह्यात हातपंप घेण्याचा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही सहा भूवैज्ञानिकांच्या टीमने जिल्हा पिंजून काढला. मात्र, हातपंपासाठी साईटच मिळत नसल्याचे समोर आले आहे. १२0३ ठिकाणी सर्व्हे करून फक्त २८७ योग्य जागा मिळून २४८ ठिकाणी खोदाई केल्यानंतर त्यात फक्त २१४ यशस्वी झाल्याचे भूवैज्ञानिक किशोर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील १४0४ ग्रामपंचायतींत गेल्या वर्षीपर्यंत १६ हजार २२७ हातपंप घेतले आहेत. यातील तब्बल १ हजार ९९८ हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. नादुरुस्त हातपंप किती असतील हे सांगता येत नाही. यातील जिल्हा परिषदेशी करार असलेले १३ हजार ७४६ हातपंप आहेत. हे वास्तव असताना टंचाईच्या नावाखाली दरवर्षी २ हजार ते ३ हजार हातपंप घेण्याचा नवा खटाटोप सुरू असतो. या वर्षीही टंचाईची चाहूल लागताच जिल्हा परिषदेने सुमारे ४१ कोटी ९१ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला. त्यात ११ कोटी ४३ लाख ९५ हजारांचा निधी एकट्या हातपंपासाठी देण्यात आला होता. १० कोटी ३२ लाख ८0 हजार नवीन हातपंपांसाठी तर दुरुस्तीसाठी १ कोटी ११ लाख १५ हजार इतका निधी देण्यात आला होता. यातून २१५४ हातपंप घेण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. खरंच टंचाई संपते का?टंचाई निवारणासाठी या विंधनविहिरी घेतल्या जातात. या वर्षी मे संपला तरी शिरूर तालुक्यात टँकर नव्हता. आता तेथे फक्त ५ टँकर सुरू आहेत. असे असताना शिरूर तालुक्यात सर्वाधिक ४५ विंधनविहिरी घेण्यात आल्या आहेत. म्हणजे जिथे टंचाई जास्त तिथे कमी व जिथे टंचाई कमी तिथे जास्त विहिरी घेतल्या. मग खरंच टंचाई निवारण होते का? हा प्रश्न निर्माण होतो.