केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:15 IST2026-04-07T13:13:02+5:302026-04-07T13:15:37+5:30

३ लाखांचा व्यवहार ठरल्यावर ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल फिर्यादीला दिले. त्यामध्ये फक्त वरची आणि खालची नोट खरी असून मधल्या सर्व बनावट असल्याचे निदर्शनास आले.

Only 2 notes are genuine; Gang buying four-wheeler busted, fake notes worth Rs 42 lakh seized from both | केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त

केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त

चाकण : भारतीय चलनातील नोटांसारख्या दिसणाऱ्या खेळण्यातील बनावट नोटांचे बंडल देऊन साडेतीन लाख रुपयांची अल्टो कार घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन जणांना चाकण उत्तर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून तब्बल ४२ लाख ५० हजार रुपयांच्या भारतीय चलनातील नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. फिर्यादी हुजेब फिरोज बागवान (वय २६, राहणार बारामती) यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गणेश ज्ञानदेव ठाकरे (२१) आणि समीर दिनकर महल्ले यांना अटक करण्यात आली आहे.

हुजेब बागवान आपल्या मित्र अरबाज आयूब शेख यांच्या मारुती सुझुकी अल्टो (एमएच ४२ एएक्स ५८८०) गाडी विकण्यासाठी पुण्यात आले होते. आरोपी गणेश ज्ञानदेव ठाकरे याने मोबाईलवरून संपर्क साधत गाडी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे चाकण येथील माणिक चौकात साडे तीन लाख रुपयांत व्यवहार ठरला. त्यापैकी तीन लाख रुपये रोख स्वरूपात प्लास्टिक रॅपरमध्ये गुंडाळलेले ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल फिर्यादीला दिले आणि उर्वरित ५० हजार रुपये नाव ट्रान्सफर झाल्यावर देण्याचे सांगून गाडी घेऊन गेले. त्यानंतर फिर्यादीने बंडल उघडून पाहिले असता, फक्त वरची आणि खालची नोट खरी असून मधल्या सर्व बनावट असल्याचे निदर्शनास आले. चाकण उत्तर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, कोळेकर, महेश कोळी, शिवाजी लोखंडे, जगझाप यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत तपास करून काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून तब्बल ४२ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title : फर्जी नोट गिरोह का भंडाफोड़; नकली मुद्रा से खरीदी कार

Web Summary : चाकन में नकली नोटों से कार खरीदने के आरोप में दो गिरफ्तार। पुलिस ने आरोपियों से 42.5 लाख रुपये की नकली मुद्रा जब्त की। पीड़ित ने बताया कि दी गई नकदी ज्यादातर नकली थी, केवल ऊपर और नीचे के नोट ही असली थे।

Web Title : Fake Note Gang Busted; Car Bought with Phony Currency

Web Summary : Two arrested in Chakan for using fake notes to buy a car. Police seized ₹42.5 lakh in counterfeit currency from the suspects. The victim reported that the cash given was mostly fake, with only top and bottom notes being genuine.