शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन लोन अ‍ॅपचा भांडाफोड;मुंबईतून संशयित अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 21:01 IST

लिंकवर क्लिक केल्यावर तिच्या मोबाईलचा पूर्ण अ‍ॅक्सेस संशयिताने घेतला आणि तिच्या नावावर फसव्या लोनची प्रक्रिया करून पैसे वसूल करण्यासाठी विविध क्रमांकांवरून धमकी दिली.

पिंपरी : देशभरातील हजारो नागरिकांना बनावट ऑनलाइन लोन अ‍ॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई येथून संशयितास अटक केली. 

इसाकी राजन थेवर (२९, रा. वाशी, मुळ रा. तमिळनाडू) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महाळुंगे येथील महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादी महिलेला ‘क्रेडीट पायलट’ या नावाने आलेल्या लिंकवरून लोन मिळेल अशा बहाण्याने फसवण्यात आले. लिंकवर क्लिक केल्यावर तिच्या मोबाईलचा पूर्ण अ‍ॅक्सेस संशयिताने घेतला आणि तिच्या नावावर फसव्या लोनची प्रक्रिया करून पैसे वसूल करण्यासाठी विविध क्रमांकांवरून धमकी दिली. या गुन्ह्यात फिर्यादीकडून अबू सिद्दिक, राकेश कुमार साहू आणि रितिक सिंग या नावाने असलेल्या यूपीआय आयडीवर एकूण नऊ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर आणखी १५ हजारांची मागणी करत धमकी देऊन मोबाईलमधील फोटो मॉर्फ करून नातेवाईकांना पाठवले. 

याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणातून लोन अ‍ॅपचे आयपी लाॅग्स तपासण्यात आले असता ते मुंबई येथून चालवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मुंबई येथून संशयित इसाकी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लॅपटॉप, ७ सिमकार्ड, २ डेबिट कार्ड आणि १ मोबाईल जप्त केला.पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलिस अंमलदार अतुल लोखंडे, दीपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, सचिन घाडगे, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, नितेश बिच्चेवार, सोपान बोधवड, माधव आरोटे, स्वप्नील खणसे, वैशाली बर्गे, शुभांगी ढोबळे, दीपाली चव्हाण, भाविका प्रधान यांच्या पथकाने ही कामगिरी केली.     

सिंगापूरमधील चिनी व्यक्तीच्या सांगण्यावरून अ‍ॅप डेवलप

क्रेडिट पायलट हे अ‍ॅप मुंबई येथे डेवलप केल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. विशेष म्हणजे फसवणुकीसाठीचे अ‍ॅप सिंगापूरमधील एका चिनी व्यक्तीच्या सांगण्यावरून डेव्हलप करण्यात आले होते.

देशभरात १० हजारांवर तक्रारी

संशयिताने क्रेडिट पायलट व्यतिरिक्त क्रेडिटकीपर, इनलोनक्रेडिट, न्यू-लोन, लिगललोन, फास्टकॅश, हॅन्डीकॅश, इन्स्टा-लोन अशा अनेक अ‍ॅप्सच्या माध्यमातून भारतभर हजारो लोकांची फसवणूक केली आहे. या अ‍ॅपवरून फसवणूक केल्याप्रकरणी देशभरात १० हजारांवर तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी