शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

ऑनलाइन शिक्षण ठराविक 'क्लास' पुरतेच.. वंचित घटकातील मुले शिक्षणापासून ' वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 7:19 AM

हातावरचे पोट असलेल्या सामान्यांची जिथं एक दिवसाच्या जेवणाची भ्रांत असताना ते स्मार्टफोन आणणार तरी कुठून? अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण केले सुरु

नम्रता फडणीस पुणे : शिक्षणाची गंगाजळी सर्वदूर पोहोचविणे हे शासन उद्दिष्ट्य असताना कोरोनामुळे लादलेल्या ऑनलाइनशिक्षणाबाबतचे चित्र मात्र नेमके उलटे पाहायला मिळत आहे. हातावरचे पोट असलेल्या सामान्यांची जिथं एक दिवसाच्या जेवणाची भ्रांत असताना ते स्मार्टफोन आणणार तरी कुठून? अशी स्थिती आहे. लॅपटॉप तर सोडाच केवळ स्मार्ट फोन हाताशी नसणे आणि जरी कुठून तरी असे फोन मिळवलेच तरी त्या फोन मध्ये इंटरनेट रिचार्ज करण्याचीही ऐपत नसल्याने अनेक वंचित मुलांचे शिक्षण थांबले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण केवळ ठराविक 'क्लास' पुरतेच आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षणाद्वारे ' न्यू एज्युकेशन' चा नारा दिल्यामुळे शहरातील खासगी आणि अनुदानित व विनाअनुदित मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग शासन आदेशानुसार सुरूही केले आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यापूर्वी दूरदर्शनवर शैक्षणिक चॅनेल सुरू केले जाईल असे शासनाने घोषित करून देखील ही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा भुर्दंड हा पालकांनाच बसला आहे. मात्र या सर्व ऑनलाइन शिक्षणाच्या गदारोळात वाड्या- वस्त्या, झोपडपट्टी मध्ये राहणारा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मात्र दुर्लक्षित राहिला आहे. या भागात राहणारे अधिकतर घरकामगार, विक्रेते या वर्गात मोडणारे आहेत.

लॉकडाऊनच्या तीन महिने काळात त्यांचे काम पूर्णत: ठप्प होते. त्यामुळे हाताशी पैसा नाही मग मुलांना ऑनलाइन शिक्षण कसे देणार? अशी चिंता या घटकाला भेडसावत आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज या गरीब आणि गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि शाळांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केली आहे. 

......... 

आमच्या शाळेचे इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले आहेत. या शाळेत अधिकांश झोपडपट्टी मधील मुले शिक्षण घेतात. सर्व मिळून 400 मुले आहेत. आम्ही केलेल्या पाहाणीनुसार जवळपास 100 मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही कुणाकडे जुने अँड्रॉईड फोन असतील तर ते आमच्या शाळेला द्यावेत असे आम्ही आवाहन केले आहे- वृषाली धोंगडे, मुख्याध्यापिका, नूतन बाल विकास मंदिर .... .

........................................

ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक मुलांचे शिक्षण संपून जाईल. खेडेगावात तर वीज देखील नाही. मग या मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे? ' आधुनिक' होणं ही चांगली गोष्ट आहे. पण आपली पूर्वतयारी झालेली नाही हे मान्य करावे लागेल. या पद्धतीने शिक्षण घेऊन उपयोग होणार नाही. एखादा अनुकरण करणारा शिक्षक हवा. तरच मुले शिकतील. स्मार्ट फोन ही विशिष्ट वगार्ची सोय आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापासून वंचित राहात आहेत- विलास चाफेकर, संस्थापक वंचित विकास संस्था 

...... समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. यातच ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट रिचार्ज देखील पालक करू शकत नसल्यामुळे अनेक मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असे वाटते की एक वर्ष त्यांना शिक्षण देऊ शकलो नाही तर काय फरक पडणार आहे- दीपा कुलकर्णी, निरामय संस्था ...... 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीonlineऑनलाइनState Governmentराज्य सरकार