onion, potato, rate increasing in Pune | पुण्यात कांदा, बटाटा, लसूण, प्लॉवर, सिमला मिरची महागली

पुण्यात कांदा, बटाटा, लसूण, प्लॉवर, सिमला मिरची महागली

ठळक मुद्देआवक आणि मागणी वाढल्याने दर वाढमागणीच्या तुलनेत आवक कमी राहील्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये तरकारी विभागात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, मागणी देखील वाढ झाल्याने कांदा, बटाटा, लसून, प्लॉवर, सिमला मिरची, गाजर, तांबडा भोपळ्याच्या दरामध्ये ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे़. तर अन्य भाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती भाजीपाल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमधील तरकारी विभागात रविवार (दि.२१) रोजी  १४० ते १५० गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून १ ते २ टेम्पो शेवगा,  हिमाचल प्रदेशातून ४ ते ५ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरातमधून कोबी ३ ते ४ ट्रक, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो कैरी, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून लसणाची पाच ते साडेपाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १००० ते १२०० पोती, टॉमेटो पाच ते साडेपाच हजार पेटी, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ३ ते ४ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, वांगी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते  १० टेम्पो, तांबडा भोपळाची १० ते १२ टेम्पो, कांदा ६० ते ७० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची ५० ते ५५ ट्रक इतकी आवक झाली.
-
पालेभाज्या तेजीतच 
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्या प्रमाणेच स्थिर आहे. मात्र आवक आणि मागणी समप्रमाणात असल्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच , पण स्थिर होते़.. मार्केटयाडार्तील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीरीची सव्वा लाख जुडी, मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी राहील्याने पालेभाज्यांचे दर तेजीतच आहेत़...
पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १३००-१६००, मेथी : ६००-१०००, शेपू : ७००-१०००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : १५०-२००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-७००, चुका : ८००-१०००, चवळई : ६००-८००, पालक : ६००-८००.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: onion, potato, rate increasing in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.