शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एकीला वाचवायला गेल्या अन् दोन सख्या बहिणींनी गमावला जीव; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 14:54 IST

दोन्ही बहिणी वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईवरून मंचरला आल्या होत्या

मंचर: एकलहरे गावच्या हद्दीत घोडनदी काठावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरती श्याम खंडागळे (वय18) व प्रीती शाम खंडागळे (वय 17 रा. मुंबई) अशी त्यांची नावे असून ही घटना आज सकाळी बारा वाजता घडली आहे.

वाढदिवस असल्याने या बहिणी मुंबई येथून एकलहरे येथे आल्या होत्या. रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी कपडे धुण्यासाठी घोडनदीवर पाचजणी गेल्या होत्या. घोडनदीवर एकलहरे गावच्या हद्दीतील नवीन पुलाजवळ आरती शाम खंडागळे, प्रीती श्याम खंडागळे, कावेरी बाबासाहेब आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे हे सर्वजण कपडे धुत होते. त्यावेळी कावेरी आरझेंडे हिचा पाय सटकून ती घोडनदीच्या पाण्यात पडली व बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती शाम खंडागळे व प्रीती श्याम खंडागळे या पाण्यात उतरल्या. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यादरम्यान पाय घसरून पडलेली कावेरी बाबासाहेब आरझेंडे ही बारा वर्षाची मुलगी वाचली आहे. कुशा नारायण घोरपडे या सुद्धा मुलींना  वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या. मात्र नाकात तोंडात पाणी जाऊ लागल्याने त्या पुन्हा माघारी फिरल्या  यावेळी तेथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष डोके, उपसरपंच दीपक डोके, पोलीस पाटील निखिल गाडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल डोके, दीपक जाधव, अक्षय धोत्रे यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली  पाण्यात बुडलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढून गौरव बारणे यांच्या रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले  तेथे डॉक्टरांनी त्या दोघी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरriverनदीWomenमहिलाDeathमृत्यू