शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

Pune Fashion Street Fire: एक होते फॅशन स्ट्रीट.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 2:12 PM

पुण्यातल्या फॅशन स्ट्रीट ला काल रात्री आग लागून संपूर्ण दुकाने जळून खाक झाली.

विक्रम मोरे - पुण्यातल्या फॅशन स्ट्रीट ला काल रात्री आग लागून संपूर्ण दुकाने जळून खाक झाली. घटनेला बारा तास उलटून गेले तरी आगीचे कारण अजून स्पष्ट झालं नाही. इथल्या दुकानांना अनधिकृत ठरवले गेल्याने हा संपूर्ण प्रकार घडल्याचा आरोप इथल्या व्यापाऱ्यांनी केला आहे. हा वाद नेमका काय आहे याविषयीचा हा रिपोर्ट.

एमजी रोड आणि कॅम्प परिसरात अनेक पथारी व्यावसायिक रस्त्यावर बसायचे. या पथारीवाल्यांबाबत वारंवार तक्रारी झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. त्यातूनच वसली ती ही फॅशन स्ट्रीट.  

       एम जी रोड व ईस्ट स्ट्रीट रोड च्या दरम्यान  जवळपास दोन एकर परिसरात अतिशय दाटीवाटीने वसलेले आहे.  १९९७ ला जेव्हा या मार्केट चे पुनर्वसन झाले तेव्हा सुरुवातीला इथे फक्त ४७१ गाळे होते. कांबळे मैदान म्हणजे आताचे फॅशन मार्केट या ठिकाणी केवळ १ वर्षाच्या करारावर ४ बाय५ म्हणजे २० चौ फूट इतका ओटा दिला होता. त्यावेळी विक्रेत्यांची संख्या ४७१ एवढी होती. त्यात सकाळी ९ ते संध्याकाळी ८ या वेळेत व्यवसाय करून घरी आपापला माल घेऊन जायचं असे नियम केला होता. त्यासाठी बोर्ड व्यवसायिकांकडून २ते ५ रुपये इतके भाडे डॅमेज चार्ज म्हणून घेतते देखील तात्पुरत्या ओट्यांवर बसवलेले. २००६ मध्ये यात १२१ गाळेधारकांनची भर पडली. मात्र काहीच वर्षात या पथारी व्यवसायाचा जागी टपऱ्या आल्या. आणि हळू हळू त्यांची संख्या देखील वाढत गेली. 

सध्या संपूर्ण फॅशन मार्केट मध्ये अनधिकृत २००० च्या वर कपडे, पादत्राण, आणि इतर ॲक्सेसरिज ची व्यापारी दुकाने आहेत. २०१८ मध्ये फायर ऑडिट होऊन या मार्केट ला कॅन्टोन्मेंट बोर्डने अनधिकृत ठरवलं. या विरोधात व्यापाऱ्यांनी हाय कोर्टात केलेली केस देखील व्यापारी हरले.पण ना हे फॅशन स्ट्रीट इथून हललं ना कोणती कारवाई झाली. उलट इथल्या परिसरात असलेल्या टपऱ्यांची संख्या मात्र वाढत गेली. 

इथे जर काही दुर्घटना झाली तर या परिसरात जीवितहानी होऊ शकते आग विझवणे अवघड होऊ शकते असे ऑडिट रिपोर्ट मध्ये म्हणण्यात आले होते. काल नेमकं हेच घडलं.कालचा आगीमध्ये फायर टेंडर आत आणण्यापासून प्रत्येक पावलावर अडचणी आल्या. पेटलेले हे संपुर्ण मार्केट विझवण्यासाठी जवळपास ६ तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.अखेर पहाटे ही आग विझली. पण या फॅशन स्ट्रीट चे मात्र नामोनिशाण या आगीत नाहीसं झालं आहे. आता एक होतं फॅशन स्ट्रीट असं म्हणायची वेळ आली आहे. लॉकडाउन मधून सावरण्यासाठी धडपडणाऱ्या व्यापाऱ्यांना हा मोठा धक्का आहे. इथेच आमचं पुनर्वसन करावं ही मागणी व्यापारी करतायेत. पण आता कॅन्टोन्मेंट बोर्ड काय निर्णय घेणार ते पहावे लागेल.

टॅग्स :PuneपुणेfireआगFire Brigadeअग्निशमन दल