शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

येरवड्यात झाडाची फांदी कोसळून एक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 9:13 PM

रवड्यात शनिआळी परिसरात पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून दोन जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली.

विमाननगर  :  येरवड्यात शनिआळी परिसरात पिंपळाच्या झाडाची फांदी अंगावर पडून दोन जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सलिम कासम शेख (वय, ४९, रा. शनिआळी, येरवडा) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाला. या घटनेमुळे महानगरपालिका प्रशासनाची उदासीनता स्पष्ट होते. वांरवार तक्रारी करून देखील धोकादायक झाडे काढली जात नाहीत.त्यामुळे वांरवार असे अपघात घडत आहेत.

गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील शनिआळी परिसरात हि घटना घडली. सलिम शेख हे घरातून बाहेर जात असताना अचानक झाडाची फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. तर आणखी एक इसम किरकोळ जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना  उपचारासाठी तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल केले. या परिसरातील हे धोकादायक झाड असून  गेल्या अनेक दिवसांपासून वांरवार तक्रारी करून देखील त्याची दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली नाही. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर महानगरपालिका प्रशासनाला जाग येणार कां ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :RainपाऊसYerwadaयेरवडा