शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, परदेशी नागरिकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 3:08 PM

भरधाव वेगाने पुढील मोटारीला ओलांडून जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला़.

ठळक मुद्देदारुच्या नशेत तो गाडी चालवत असल्याचे उघडकीस आली आहे.

पुणे : भरधाव वेगाने पुढील मोटारीला ओलांडून पुढे जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला़. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी येमेनच्या नागरिकाला अटक केली आहे़. दारुच्या नशेत तो गाडी चालवत असल्याचे उघडकीस आली आहे. हा अपघात येवलेवाडी येथील के़.जे़ कॉलेजजवळ सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडला़. परशुराम दत्तात्रय दळवी (वय २५, रा़ हिवरे, ता़ पुरंदर) असे मृत्यू  झालेल्या तरुणाचे नाव आहे़. त्याचा साथीदार विनोद तुकाराम शेंडकर (वय ४६, रा़ चांबळी, ता़ पुरंदर) हे जखमी झाले आहेत़. पोलिसांनी आयाज महमद अल अमरी (रा़ लस्ट लाईफ सोसायटी, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तिचे नाव आहे़. याप्रकरणी प्रकाश बापूराव भालेराव (वय ३८, रा़ चांबळी, ता़ पुरंदर) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रकाश भालेराव व चेतन शेंडकर हे मोटारीने बोपदेव घाटमार्गे पुण्याला येत होते़. के़ जे़ कॉलेजजवळ त्यांच्या मागून एक मोटार वेगाने ओलांडून पुढे जात असताना पुण्याकडून सासवडकडे जाणाऱ्या दुचाकीला तिने जोरात धडक दिली़ . दुचाकीवरील दोघेही उडून बाजूच्या दगडावर पडले़. त्यानंतर ती मोटार न थांबता निघून गेली़. मोटारीत दोघे जण होते़ भालेराव यांनी थांबून पाहिले असता दोघेही त्यांच्या जवळच्या हिवरे गावातील असल्याचे त्यांनी ओळखले़. परशुराम दळवी हे बेशुद्ध पडले होते़. त्यांना रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आले़. मात्र , डॉक्टर तपासणीपूर्वीच दळवी यांचा मृत्यू झाला़ मोटारीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी चालक आयाज महमद अल अमरी यांना अटक केली आहे़ . 

 

  

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिस