मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, परदेशी नागरिकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:08 IST2018-04-10T15:08:31+5:302018-04-10T15:08:31+5:30
भरधाव वेगाने पुढील मोटारीला ओलांडून जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला़.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, परदेशी नागरिकास अटक
पुणे : भरधाव वेगाने पुढील मोटारीला ओलांडून पुढे जात असताना समोरुन आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला़. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी येमेनच्या नागरिकाला अटक केली आहे़. दारुच्या नशेत तो गाडी चालवत असल्याचे उघडकीस आली आहे. हा अपघात येवलेवाडी येथील के़.जे़ कॉलेजजवळ सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडला़. परशुराम दत्तात्रय दळवी (वय २५, रा़ हिवरे, ता़ पुरंदर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़. त्याचा साथीदार विनोद तुकाराम शेंडकर (वय ४६, रा़ चांबळी, ता़ पुरंदर) हे जखमी झाले आहेत़. पोलिसांनी आयाज महमद अल अमरी (रा़ लस्ट लाईफ सोसायटी, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तिचे नाव आहे़. याप्रकरणी प्रकाश बापूराव भालेराव (वय ३८, रा़ चांबळी, ता़ पुरंदर) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रकाश भालेराव व चेतन शेंडकर हे मोटारीने बोपदेव घाटमार्गे पुण्याला येत होते़. के़ जे़ कॉलेजजवळ त्यांच्या मागून एक मोटार वेगाने ओलांडून पुढे जात असताना पुण्याकडून सासवडकडे जाणाऱ्या दुचाकीला तिने जोरात धडक दिली़ . दुचाकीवरील दोघेही उडून बाजूच्या दगडावर पडले़. त्यानंतर ती मोटार न थांबता निघून गेली़. मोटारीत दोघे जण होते़ भालेराव यांनी थांबून पाहिले असता दोघेही त्यांच्या जवळच्या हिवरे गावातील असल्याचे त्यांनी ओळखले़. परशुराम दळवी हे बेशुद्ध पडले होते़. त्यांना रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आले़. मात्र , डॉक्टर तपासणीपूर्वीच दळवी यांचा मृत्यू झाला़ मोटारीच्या क्रमांकावरुन पोलिसांनी चालक आयाज महमद अल अमरी यांना अटक केली आहे़ .