एकाची दुसऱ्याच्या पत्नीवर कमेंट; रागाच्या भरात खून, रक्तानं माखलेल्या मोबाईलनं शोधला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:14 IST2025-02-17T13:13:34+5:302025-02-17T13:14:15+5:30

रक्ताने माखलेला मोबाइलच बोलला आणि मृताची ओळख पटली अन् आरोपीचे नाव समजले, भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाऊन आरोपीला पकडून आणले

One person comment on another wife Murder in anger accused found with blood-stained mobile phone | एकाची दुसऱ्याच्या पत्नीवर कमेंट; रागाच्या भरात खून, रक्तानं माखलेल्या मोबाईलनं शोधला आरोपी

एकाची दुसऱ्याच्या पत्नीवर कमेंट; रागाच्या भरात खून, रक्तानं माखलेल्या मोबाईलनं शोधला आरोपी

धनकवडी: अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून त्याचा खून करून पश्चिम बंगाल येथे पसार झालेल्या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या ३६ तासांच्या आत पश्चिम बंगालमधून ताब्यात घेतले असून बिरण सुबल करकर ऊर्फ बिरण सुबल कर्माकर, (वय ३० वर्षे, रा, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर नयन गोरख प्रसाद, (वय ४५ वर्षे, रा. जि. सिवान) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आंबेगाव पठार येथील चिंतामणी चौकात बांधकाम चालू असलेल्या साइटच्या पहिल्या मजल्यावर अज्ञात इसमाचा, कोणत्या तरी अज्ञात कारणावरून, कोणत्या तरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारून, त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी तात्काळ तपास पथकाचे अधिकारी नीलेश मोकाशी व पोलिस अंमलदार यांना मयत इसमाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या.

तपास पथकाचे अधिकारी नीलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलिस अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळून आलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाइल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यावरून मयत इसमाचे नाव आणि पत्ता निष्पन्न झाले. त्या नंबर मयतच्या मोबाइल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये मयत इसमाचे सोबत बिरण सुबल करकर ऊर्फ बिरण सुबल कर्माकर, हा इसम असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. दरम्यान बिरण सुबल करकर ऊर्फ बिरण सुबल कर्माकर याचा शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलिस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल येथे जाऊन नमूद आरोपीचा शोध घेतला असता तो हावडा रेल्वे स्टेशन भागातून अटक करण्यात आली आहे.

दारू पिल्यानंतर मती फिरली, एकाने दुसऱ्याच्या पत्नीवर कमेंट केले, त्यामुळे झालेल्या वादात खोलीतील लोखंडी पहारीने वार करून खून करून आरोपी पळून गेला. दोन दिवसांनंतर वास येऊ लागल्यावर खून झाल्याचे उघडकीस आले; परंतु खुनाची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनतर मृतदेह सडू लागल्याने त्याची ओळख पटू शकत नव्हती. खून झालेला कोण आणि आरोपी कोण याचा काही पत्ता लागत नव्हता. अशा वेळी पोलिसांच्या मदतीला धावून आला रक्ताने माखलेला एक मोबाइल. रक्ताने माखलेला मोबाइलच बोलला आणि मृताची ओळख पटली अन् आरोपीचे नाव समजले. भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे जाऊन आरोपीला पकडून आणले.

Web Title: One person comment on another wife Murder in anger accused found with blood-stained mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.