शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

कॅम्पमध्ये अनधिकृत इमारतीचा लाकडी सांगाडा तुटल्याने एका मजुराचा मृत्यू; चार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:54 IST

एवढी मोठी घटना घडूनही, इमारतीचे मालक अथवा पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांत मोठा उद्रेक असल्याचे पाहायला मिळाले

लष्कर (पुणे कॅम्प) : सरबतवाला चौक येथील साचापीर स्ट्रीट वरील घर क्र ५९४ व ५९५ चे अनधिकृत बांधकाम सुरू असताना इमारतीचे काम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लाकडी सांगाडा वर असलेली फळी खाली कोसळली आणि त्यावर काम करणारे शुभंकर मंडल ह्या परप्रांतीय युवक मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर इतर ४ युवक हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी १ वाजेचा दरम्यान घडली. स्थानिक कार्यकर्ते दिनेश आंधळकर, यांच्या समय सूचकतेनंतर ही घटना उघडकीस आली. एवढी मोठी घटना घडूनही, इमारतीचे मालक अथवा पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांत मोठा उद्रेक असल्याचे पाहायला मिळाले.

घडलेल्या घटनेनुसार साचापीर स्ट्रीट वरील जुने हॉटेल ओयसिस येथील जुना बंगाल क्र ५९४ व ५९५ चे मिळालेल्या परवानगीच्या विरुद्ध बांधकाम अनधिकृत रित्या सुरू होते. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथे इमारतीचे काम करताना उभारलेल्या ३० फुटावरीतील लाकडी सांगाड्यावर पश्चिम बंगाल मधील १७ ते २४ वयोगटातील ५ तरुण कामगार काम करीत होते. अचानक हा लाकडी सांगाडा वरील फळी खाली कोसळली. त्यामुळे हे पाचही तरुण खाली कोसळले त्यादरम्यान शुभंकर मंडल ह्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असणारे इतर चार कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घर मालक आणि बिल्डर फरार 

दुर्घटन घडल्यानंतर ह्या इमारतीचे मालक आणि बिल्डर असलेले राणावत आणि मेहता ही मंडळी फरार झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ह्या घटनेनंतर बोर्डातील अधिकृत बांधकाम याला परवानगी कशी मिळते असा प्रश्न उपस्थित होतो.

घटनेनंतर कँटोन्मेंट अधिकारी फरार तर अग्निशमन दल उशिरा घटनास्थळी 

दुपारी१ च्या दरम्यान घडलेली ही दुर्घटना असताना स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब दुपारी तीन च्या दरम्यान समोर आणली. त्यांनी कँटोन्मेंट च्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी आपलं फोन बंद केला. तर बोर्डाची अग्निशमन दलाची गाडी दुर्घटन होऊन तब्बल दीड तास उशिरा आली त्याअगोदर स्थानिकांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहचवले होते.

टॅग्स :PuneपुणेEmployeeकर्मचारीDeathमृत्यूAccidentअपघातGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल