कॅम्पमध्ये अनधिकृत इमारतीचा लाकडी सांगाडा तुटल्याने एका मजुराचा मृत्यू; चार गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:54 IST2025-07-01T17:54:25+5:302025-07-01T17:54:46+5:30
एवढी मोठी घटना घडूनही, इमारतीचे मालक अथवा पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांत मोठा उद्रेक असल्याचे पाहायला मिळाले

कॅम्पमध्ये अनधिकृत इमारतीचा लाकडी सांगाडा तुटल्याने एका मजुराचा मृत्यू; चार गंभीर जखमी
लष्कर (पुणे कॅम्प) : सरबतवाला चौक येथील साचापीर स्ट्रीट वरील घर क्र ५९४ व ५९५ चे अनधिकृत बांधकाम सुरू असताना इमारतीचे काम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या लाकडी सांगाडा वर असलेली फळी खाली कोसळली आणि त्यावर काम करणारे शुभंकर मंडल ह्या परप्रांतीय युवक मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर ४ युवक हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी १ वाजेचा दरम्यान घडली. स्थानिक कार्यकर्ते दिनेश आंधळकर, यांच्या समय सूचकतेनंतर ही घटना उघडकीस आली. एवढी मोठी घटना घडूनही, इमारतीचे मालक अथवा पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे कुठलेही अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने स्थानिकांत मोठा उद्रेक असल्याचे पाहायला मिळाले.
घडलेल्या घटनेनुसार साचापीर स्ट्रीट वरील जुने हॉटेल ओयसिस येथील जुना बंगाल क्र ५९४ व ५९५ चे मिळालेल्या परवानगीच्या विरुद्ध बांधकाम अनधिकृत रित्या सुरू होते. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथे इमारतीचे काम करताना उभारलेल्या ३० फुटावरीतील लाकडी सांगाड्यावर पश्चिम बंगाल मधील १७ ते २४ वयोगटातील ५ तरुण कामगार काम करीत होते. अचानक हा लाकडी सांगाडा वरील फळी खाली कोसळली. त्यामुळे हे पाचही तरुण खाली कोसळले त्यादरम्यान शुभंकर मंडल ह्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असणारे इतर चार कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घर मालक आणि बिल्डर फरार
दुर्घटन घडल्यानंतर ह्या इमारतीचे मालक आणि बिल्डर असलेले राणावत आणि मेहता ही मंडळी फरार झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ह्या घटनेनंतर बोर्डातील अधिकृत बांधकाम याला परवानगी कशी मिळते असा प्रश्न उपस्थित होतो.
घटनेनंतर कँटोन्मेंट अधिकारी फरार तर अग्निशमन दल उशिरा घटनास्थळी
दुपारी१ च्या दरम्यान घडलेली ही दुर्घटना असताना स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब दुपारी तीन च्या दरम्यान समोर आणली. त्यांनी कँटोन्मेंट च्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी आपलं फोन बंद केला. तर बोर्डाची अग्निशमन दलाची गाडी दुर्घटन होऊन तब्बल दीड तास उशिरा आली त्याअगोदर स्थानिकांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहचवले होते.