Pune | पुणे-नगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 21:25 IST2023-03-20T21:24:23+5:302023-03-20T21:25:02+5:30
पुणे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची गोविंद यांना जोरात धडक बसून अपघात...

Pune | पुणे-नगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
शिक्रापूर (पुणे) : येथील पुणे-नगर महामार्गावर वाहनाच्या धडकेत गोविंद संग्राम पवार या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावर असलेल्या अजिंक्यतारा हॉटेलसमोरून गोविंद पवार हे रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची गोविंद यांना जोरात धडक बसून अपघात झाला.
यावेळी गोविंद हा रस्त्यावर पाडून गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गोविद संग्राम पवार (वय ३६, रा. जकाते वस्ती, शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. कजमलवाडी, ता. देवणी, जि. लातूर) यांचा मृत्यू झाला. याबाबत सुदर्शन बापूराव बिरादार (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे करीत आहेत.