Pune News | कनेरसर-पाबळ रस्त्यावर दुचाकीची धडक बसल्याने एकाचा मूत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 18:23 IST2023-03-24T18:21:46+5:302023-03-24T18:23:14+5:30

होलेवाडी येथे दुचाकीची जोरदार धडक बसल्याने एकाचा मूत्यू...

One dies after being hit by a bike on Kanersar-Pabal road pune latest crime news | Pune News | कनेरसर-पाबळ रस्त्यावर दुचाकीची धडक बसल्याने एकाचा मूत्यू

Pune News | कनेरसर-पाबळ रस्त्यावर दुचाकीची धडक बसल्याने एकाचा मूत्यू

राजगुरूनगर (पुणे) : कनेरसर -पाबळ रस्त्यावर होलेवाडी येथे दुचाकीची जोरदार धडक बसल्याने एकाचा मूत्यू झाल्याची घटना (दि २३ रोजी ) घडली आहे. विठठ्ल बाळासाहेब होले (४६, रा. होलेवाडी, ता. खेड) असे या अपघातात मुत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री होलेवाडी येथे रस्त्यावर नमित हॉटेल समोर विठ्ठल होले जेवण करून रस्त्यावर वाकिंगसाठी गेले होते. दरम्यान, खेड बाजूकडून येणाऱ्या दुचाकीची विठ्ठल होले यांना जोरदार धडक बसली. डोक्यास गंभीर मार लागल्याने तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकी चालक अबरार अहमंद छोटे शहा अलवी (रा.चव्हाणमळा ता. खेड ) यांच्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: One dies after being hit by a bike on Kanersar-Pabal road pune latest crime news