लोणावळा : लोणावळा लायन्स पॉईंट मार्गावरील एस पॉईंट याठिकाणी पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील कार सुमारे दिडशे फुट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात कारमधील एक जणाचा जागीच मृत्यु झाला तर एका युवतीसह तीन जण जखमी झाले आहेत. मनिष रमेश प्रितवाणी (वय २५, रा. खारघर, मुंबई) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. लोणावळा ते लायन्स पॉईंट दरम्यानच्या मार्गावर चढउतार व तीव्र वळणे आहेत. रात्री उशिरा हे पर्यटक चारचाकी गाडीने लायन्स पॉईट परिसरात गेले होते. त्याठिकाणी मौजमजा केल्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याकडे येत असताना मार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी झाडाझुडपातून थेट दिडशे ते दोनशे फुट खोल दरीत कोसळली.
लोणावळा येथील एस पॉईटच्या दरीत जीप पडून १ जण ठार; तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 15:46 IST
मौजमजा केल्यानंतर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याकडे येत असताना मार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने गाडी झाडाझुडपातून थेट दिडशे ते दोनशे फुट खोल दरीत कोसळली.
लोणावळा येथील एस पॉईटच्या दरीत जीप पडून १ जण ठार; तीन जखमी
ठळक मुद्देसर्व जण दारुच्या नशेत असल्याची माहिती पुढे लोणावळा ते लायन्स पॉईंट दरम्यानच्या मार्गावर चढउतार व तीव्र वळणे