शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ

By admin | Updated: June 18, 2015 23:44 IST

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज भरण्यासाठी अकरावी प्रवेश समितीने एक दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अद्याप प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांना १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरून सबमिट करता येणार आहे,असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिध्द केलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार १८ जून ही आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतीम तारिख होती. मात्र,उपनगर परिसरातील काही विद्यार्थ्यांना वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे आॅनलाईन अर्ज भरता आलेला नाही. त्याच प्रमाणे काही शाळांमध्ये तसेच मार्गदर्शन केंद्रांमध्ये अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर राहण्याची शक्यता असल्याचे प्रवेश समितीला जाणवले. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. जाधव म्हणाले, एकही विद्यार्थी आॅनलाइन प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत विद्यार्थी अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका विकत घेवू शकतील. दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरावा. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्जाच्या दुसऱ्या भागात कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून अर्ज सबमिट करावा. कमीत कमी ४० आणि जास्तीत जास्त ५० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवेशच्या माहिती पुस्तिकांची विक्री गरवारे कॉलेज सह केवळ विभागीय केंद्रावर केली जाणार आहे. (प्रतिनिधी)- आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी गुरूवारी ५ वाजेपर्यंत ७५ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी लॉग इन केले.त्यातील ७० हजार ३६४ विद्यार्थ्यांनी अर्ज अ‍ॅप्रुव्ह केले आहेत.तर ६४ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरून अर्ज फायनल केला आहे.त्यामुळे सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांचा अर्ज फायन करायचा राहिल्याचे दिसून येते. हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याचा विचार समितीने केला मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे, असेही रामचंद्र जाधव म्हणाले.