शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

जुन्या बांधकामांना नव्या नियमांनुसार परवानगी, प्रशासनाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:44 AM

पुणे : महापालिका हद्दीतील जुन्या नियमाने बांधण्यात आलेल्या, पण महापालिकेकडून पूर्णत्वाता दाखला घेतला नाही अशा बांधकामांना नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम करता येईल, असे स्पष्टीकरण करणारे पत्र नगरविकास विभागाने महापालिकेला दिले

पुणे : महापालिका हद्दीतील जुन्या नियमाने बांधण्यात आलेल्या, पण महापालिकेकडून पूर्णत्वाता दाखला घेतला नाही अशा बांधकामांना नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम करता येईल, असे स्पष्टीकरण करणारे पत्र नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहे. यामुळे आता जुन्या नियमाने मान्य झालेल्या बांधकामांना नव्या नियमानुसार बांधकाम करता येईल.महापालिकेसाठी तयार केलेल्या विकास नियंत्रण नियमावलीला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. मात्र, त्यात जुन्या बांधकामांना त्यांना नवे बांधकाम करायचे असेल, तर नव्या नियमाने परवानगी द्यावी किंवा जुन्या असा संभ्रम महापालिका प्रशासनासमोर होता. याचे कारण शहरातील अनेक प्रकल्पांना जुन्या नियमांनुसार परवानगी दिली होती व ते अपुरे होते. काहींनी पूर्ण झाल्यानंतरही बांधकाम विभागाचा पूर्णत्वाचा दाखला घेतला नव्हता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे स्पष्टीकरण मागितले होते. महापालिकेकडे आलेले जुन्या बांधकामात बदल करण्याची परवानगी मागणारे अनेक प्रस्ताव त्यामुळे प्रलंबित होते. नगरविकास विभागाने याबाबत स्पष्टीकरण देताना नव्या नियमावलीचा जुन्या बांधकामांना परवानगी देताना उपयोग करावा, असे म्हटले आहे.नवीन नियमावलीनुसार मिळणारा एफएसआय, टीडीआर यानुसार होणारे बांधकाम यातून सध्या प्रत्यक्ष जागेवर झालेले बांधकाम वजा करून जे क्षेत्र शिल्लक राहील, तेवढे बांधकाम संबंधित विकसकाला करता येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.मात्र,हे करताना नव्या विकास नियंत्रण नियमावलीत असलेले सर्व नियम, अटी यांचे संबंधितांना पालन करावे लागेल, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका