रस्त्यावर सांडले ऑईलचे कॅन ; घसरुन पडून वाहनचालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 15:46 IST2019-12-31T15:45:28+5:302019-12-31T15:46:48+5:30
ऑईलचे कॅन रस्त्यावर सांडल्याने अनेक वाहनचालक घसरुन पडल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली.

रस्त्यावर सांडले ऑईलचे कॅन ; घसरुन पडून वाहनचालक जखमी
पुणे : पुण्यातील वानवडी भागात वानवडी पाेलीस स्टेशनसमाेर माेठ्याप्रमाणावर ऑईल सांडल्याने अनेक वाहनचालक घसरुन पडले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून वाहतूक सुरु केली.
आज दुपारी 12 च्या सुमारास वानवडी पाेलीस स्टेशन समाेरील रस्त्यावर वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ऑईलचे 4 कॅन घेऊन जाणाऱ्या दुचाकी चालकाची एका चारचाकीला धडक बसल्याने सर्व कॅन रस्त्यावर पडून परिसरात सर्वत्र ऑईल पसरले. या अपघातात दुचाकीचालक देखील जखमी झाला. या भागातून जाणाऱ्या वाहने या ऑईलवरुन घसरल्याने अनेक अपघात झाले. यात 8 ते 10 नागरिक जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळातच काेंढवा खुर्द अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसिबीच्या सहाय्याने रस्त्यावर माती टाकत रस्ता सुरक्षित केला. त्यामुळे पुढील अपघात टळले.