अबब...! पुण्यात पाच महिन्यांत मास्क न घालणाऱ्यांकडून तब्बल 18 कोटी 64 लाखांचा दंड वसूल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 08:39 PM2020-12-29T20:39:31+5:302020-12-29T20:43:16+5:30

सध्या टार्गेट ठेवून केली जाते दंड वसुली 

Ohh ...! A fine of Rs 18.64 crore was recovered from those who did not wear masks in five months | अबब...! पुण्यात पाच महिन्यांत मास्क न घालणाऱ्यांकडून तब्बल 18 कोटी 64 लाखांचा दंड वसूल 

अबब...! पुण्यात पाच महिन्यांत मास्क न घालणाऱ्यांकडून तब्बल 18 कोटी 64 लाखांचा दंड वसूल 

Next

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लोकांना मास्क वापरण्याची सवय लागावी म्हणून प्रशासनाने  सप्टेंबर महिन्यापासून रस्त्यावर,  सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणा-या व रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. यात गेल्या पाच महिन्यांत एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 5 लाखांहून अधिक लोकांवर कारवाई करण्यात 18 कोटी 64 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. सध्या लोकांनी मास्क घालावा याबाबत जनजागृती करत दंड वसुली करण्याऐवजी मास्क न घालणारी व्यक्ती दिसल्यास कसा भेटला बकरा या अविर्भावात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पोलीस, प्रशासनाला सापडलेला 'महसुल ' गोळा करण्याचा नवा फंडा सापडला आहे. 
जिल्ह्यात मार्च महिन्यांत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडाला. गेल्या दहा महिन्यांत ही संख्या 3 लाख 61 हजारांवर जाऊन पोहचली. यात तब्बल 8 हजार 785 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 837 ऐवढी आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रूग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना नागरिक मात्र फारसे गंभीर नव्हते. कोरोना हा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या. याच कारवाईचा एक भाग म्हणून मास्क न घालणारे व रस्ता, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
जिल्ह्यात सर्वाधिक 9 कोटी 83 लाखांचा दंड पुणे शहरातून वसूल करण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामीण भागात 2 लाख 32 हजार 350 लोकांवर कारवाई करत 5 कोटी 20 लाखांचा व पिंपरी चिंचवड शहरातून 90 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. 
------
जिल्ह्यात अशी झाली कारवाई 
पुणे शहर : लोकसंख्या- 2 लाख 4 हजार 444
                  दंडाची रक्कम- 9 कोटी 83 लाख 53 हजार 
पिंपरी-चिंचवड  : लोकसंख्या-  66 हजार 566
                           दंडाची रक्कम- 90 लाख 55 हजार
पुणे ग्रामीण :  लोकसंख्या- 2 लाख 32 हजार 350
                       दंडाची रक्कम- 5 कोटी 20 लाख 48 हजार

Web Title: Ohh ...! A fine of Rs 18.64 crore was recovered from those who did not wear masks in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.