शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

अबब ! एवढे बेशिस्त अन् तेही पुण्यात, नऊ दिवसांत विना मास्क फिरणाऱ्या २८ हजार जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 2:21 PM

विना मास्क घराबाहेर पडणे आता पुणेकरांना महागात पडणार;१ कोटी ४० लाखांचा दंड वसूल

ठळक मुद्देवाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक शाखेकडून केला जाणारा दंड शासन तिजोरीत जमा

पुणे : विना मास्क घराबाहेर पडणे आता पुणेकरांना महागात पडणार आहे. शहर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला असून, नऊ दिवसातच  (२ ते १० सप्टेंबर)  २७ हजार ९८९ पुणेकरांकडून १ कोटी ४० लाख दंड वसूल करण्यात आला आहे.     कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडला की मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही अद्याप पुणेकरांमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहर पोलीस प्रशासनाला कारवाईचे शस्त्र उगारणे अनिवार्य ठरले आहे. त्यानुसार जर चेहर्यावर मास्क नसेल तर बाहेर फिरणे पुणेकरांना महागात पडणार आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या आता कोणत्याही सबबींना थारा दिला जाणार नाही. ८ सप्टेंबर पर्यंत पोलिसांनी १५ हजार २०६ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७६ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता..एका दिवसातच हा आकडा 1 कोटीच्या घरात पोहोचला आहे. विना मास्क कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेने पोलिसांना प्रदान केले आहेत. त्यामुळे        वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक शाखेकडून केला जाणारा हा दंड शासन तिजोरीत जमा केला जात आहे. या कारवाईला सामोरे जायचे नसल्यास बाहेर पडताना मास्क वापरण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे...... 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसcollectorजिल्हाधिकारी