शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीकडे आलेल्या अधिकाऱ्याला 'पहिलवान' ज्येष्ठाने झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 10:41 IST

सुरक्षारक्षक व शेजाऱ्यांच्या मदतीने सदर व्यक्तीने सुटका करून घेतली..

ठळक मुद्देविश्रांतवाडीतील धक्कादायक प्रकार,अदखलपात्र गुन्हा नोंदवलास्थानिक विक्षिप्त ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल

पुणे  : बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या मुंबई येथील अधिकाऱ्याला एका विक्षिप्त ' पहिलवान' जेष्ठ नागरिकांने विनाकारण जबरी मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडी येथे नुकतीच घडली. सुरक्षारक्षक व शेजाऱ्यांच्या मदतीने सदर व्यक्तीने सुटका करून घेतली. मात्र या स्थानिक विक्षिप्त ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध विश्रांतवाडीपोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या विक्षिप्त ज्येष्ठ नागरिकाचा सोसायटी महिला व इतरांना कायमच त्रास असून सोसायटीच्या वतीने पोलिसांना लेखी तक्रार दिल्याचे समजते. याबाबतची माहिती अशी, मुंबई महापालिकेतील कर विभागाचे अधिकारी अरूण रणधीर (वय ५५) हे शनिवारी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी विश्रांतवाडी येथे आले होते. बहिण घरी नसल्याने ते वाट पाहत जिन्यात उभे असताना अचानक समोरून एका अनोळखी ज्येष्ठ नागरिकाने त्यांना हटकले. तू इथे का थांबला?असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रणधीर यांनी काही बोलण्यापूर्वीच त्यांनी त्यांना मारहाण करण्यास झोडपले. यावेळी मारहाण करणाºया व्यक्ती सोबत उभ्या असलेल्या दोन महिलांपैकी एकीने त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांना न जुमानता वाद सोडवण्यासाठी आलेल्या कोणाचे काही एक न ऐकता त्यांनी रणधीर यांना थेट  जिन्यातून ढकलून दिले. रणधीर जिन्यावरुन गडगडत खाली कोसळले. सुरक्षारक्षक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने रणधीर यांनी सुटका करून घेतली.हा मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.  याप्रकरणी जबरी मारहाण प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. रणधीर यांना वैद्यकीय तपासणीत डोक्याला व पूर्ण अंगाला मोठ्या प्रमाणावर मुका मार लागला असून हाताला जखम झाली आहे. सीसीटिव्ही फुटेजसह तक्रार करून देखील विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने रणधीर यांच्या कुटुंबियांनी सांगितले. याप्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना माहिती दिल्यावर मंगळवारी रात्री विश्रांतवाडी पोलिसांना जाग आली. याप्रकरणी त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिली. या प्रकरणामुळे जबरी मारहाणीचा गंभीर प्रकार घडून देखील पोलिसांनी केवळ  अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारासाठी चर्चेत असणाºया विश्रांतवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेVishrantwadiविश्रांतवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस