corona virus ; लॉक डाऊनचा गैरफायदा घेऊन जादा दराने किराणा विकणार्‍या दुकानदारांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 09:16 PM2020-04-01T21:16:42+5:302020-04-01T21:18:41+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लॉक डाऊन जाहीर केले आहे. या संधीचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने किराणा मालाची विक्री करणार्‍या दुकानदारावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Offenses against lock-downs offset grocery shoppers | corona virus ; लॉक डाऊनचा गैरफायदा घेऊन जादा दराने किराणा विकणार्‍या दुकानदारांवर गुन्हा

corona virus ; लॉक डाऊनचा गैरफायदा घेऊन जादा दराने किराणा विकणार्‍या दुकानदारांवर गुन्हा

Next

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लॉक डाऊन जाहीर केले आहे. या संधीचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने किराणा मालाची विक्री करणार्‍या दुकानदारावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे पथक सदाशिव पेठेत एका दुकानदार जादा दराने मालाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध अन्न व पुरवठा निरीक्षक प्राजक्ता माळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम ३, ७ व भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लॉक डाऊनच्या काळात किराणा मालाच्या विक्रीची परवानगी दिली असताना त्याचा गैरफायदा घेऊन सिगारेटची विक्री करणार्‍या विक्रम खंडेलवाल या दुकानदारावर १८८ नुसार समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस उपनिरीक्षक महाडिक, कर्मचारी मोकाशी हे  समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तिरुपती मिनी मार्केट या किराणा माल दुकानात खंडेलवाल हा सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना मिळून आला. यावेळी त्याच्या ताब्यातून २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Offenses against lock-downs offset grocery shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.