शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

जागा खरेदी व्यवहारात दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:10 IST

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इम्रान व सुशील शिंदे हे मित्र आहेत. शिंदे यांनी घर बांधण्यासाठी गुणवडी येथील २ ...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इम्रान व सुशील शिंदे हे मित्र आहेत. शिंदे यांनी घर बांधण्यासाठी गुणवडी येथील २ गुंठे जागा सव्वा लाख रुपयांना घेतली होती. ही जागा इम्रान याने बघितल्यानंतर त्याने जागा खराब असल्याचे सांगून शिंदे दाम्पत्याला ती विकण्यास भाग पाडले. त्या बदल्यात बारामतीत चांगल्या ठिकाणी तुम्हाला जागा घेऊन देतो, असे आश्वासन त्याने दिले होते. त्यानुसार पठाण याच्या सांगण्यावरून ती जागा मुजफ्फर सलिम रंगरेज यांना विकण्यात आली. काही दिवसांनंतर त्याने शहरातील बारामती हॉस्पिटलनजीक एक गुंठे जागा या दाम्पत्याला दाखवली. ही जागा चांगली असल्याने शिंदे यांनी ती खरेदी घेण्याची तयारी दाखवली. त्यानंतर पठाण याने या जागेचे खरेदीखत होत नसून स्टॅम्पवर नोटरी करून घ्यावी लागेल, असे सांगितले. रीतसर खरेदीखत होत नसल्याने शिंदे यांनी जागा घेण्यास नकार दर्शवला. परंतु त्यानंतरही त्याने वारंवार विनंती केली. अशी जागा पुन्हा मिळणार नाही, तुम्ही ती घ्या, अशी गळ घातली.

त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून संबंधित जागा मालकाला देण्यासाठी ५० हजार रुपये इसार रक्कम देण्यात आली. त्यानंतर नोटरीबाबत विचारणा केली असता तो दुर्लक्ष करू लागला. विविध कारणे सांगू लागला. जागा नको, पैसे माघारी द्या अशी मागणी केली असता, तुमच्या नावावर शेतजमीन नाही. त्यामुळे तुम्हाला ही जागा घेता येत नाही. ती जागा माझ्या नावावर घेऊ, पुढे ती तुमच्या नावे करू, असे त्याने सुचवले. त्यानुसार शिंदे दाम्पत्याने त्याच्याकडे चार लाख रुपये दिले. जागा नावावर करून देण्याची मागणी केली असता तो पलटला. त्याने ही जागा माझ्या नावावर आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगत फिर्यादीच्या पतीला शिविगाळ, दमदाटी केली. सतत तगादा लावला असता, माझे राजकीय संबंध आहेत. तुम्हा दोघांना मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.