शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

भात पेरण्यांसाठी पोषक पाऊस

By admin | Updated: June 21, 2016 00:20 IST

या वर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तवल्याने खरीप हंगाम घेण्यासाठी सज्ज झालेल्या बळीराजाला गेले दहा दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत बसावे लागले.

पुणे : या वर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तवल्याने खरीप हंगाम घेण्यासाठी सज्ज झालेल्या बळीराजाला गेले दहा दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत बसावे लागले. अखेर रविवारी त्याने जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हजेरी लावली आणि दिलासा दिला. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ६.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागल्याने पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या होत्या. उगवून आलेल्या रोपांचे कोंब सुकू लागले असून, जमिनीतील दाणे कोठण्याची वेळ आली आहे. यामुळे ही रोपे पाटाचे पाणी, टँकरने पाणी देऊन वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे. पावसाच्या प्रतीक्षेमुळे अजूनही निम्म्या अर्ध्या भातपेरण्या रखडल्या आहेत. यंदा रोहिणी नक्षत्र सरून मृगही संपत आला तरी आकाशात ढगांचा ठिपूस दिसत नव्हता. मृग नक्षत्राची आज समाप्ती झाली. मात्र, यापूर्वी एक दिवस अगोदर आर्द्रा नक्षत्राच्या पूर्वसंध्येला वरुणराजा बळीराजाच्या मदतीला धावून आला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबग पुन्हा सुरू झाली आहे. आणखी काही दिवस पावसात सातत्य राहिले तर जमिनीतील नांगरलेली ढेकळं भिजून पिकांच्या पेरण्यांसाठी पोषक वातावरण होईल.(प्रतिनिधी)लोणावळा परिसरात धुकेलोणावळा : लोणावळा, खंडाळा, लायन्स पॉइंट व ग्रामीण भागात सर्वत्र सोमवारी सकाळपासून धुक्याचे काहूर माजल्याने वाटा धुक्यात हरविल्या आहेत. डोंगरभागात दाट धुके पडले असून, बारीक पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा पसरला आहे.मागील दोन-तीन दिवसांपासून लोणावळ्यात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. यामुळे शहरात ढगाळ वातावरण असून, धुके पसरले होते. घाट परिसरात धुके जास्त असल्याने वाहने सावकाश चालवावी लागली.(वार्ताहर)