शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

राज्यात वाढली ‘सेट’धारक बेरोजगारांची संख्या, निकालाचा टक्का वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 1:13 AM

- राहुल शिंदे पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार प्राध्यापक पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट या परीक्षेचा निकाल दीड ...

- राहुल शिंदेपुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशानुसार प्राध्यापक पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट या परीक्षेचा निकाल दीड ते ३ टक्क्यांपर्यंत लागायचा. तो आता ६ टक्क्यांवर लावला जात आहे. परंतु नोकºयाचा उपलब्ध नसल्याने सेट होऊनही बेरोजगार रहावे लागत असणाऱ्यांचा टक्काही त्याबरोबरच वाढला आहे.सेट निकालाचा टक्का अत्यल्प असून उत्तीर्णांचे प्रमाण किमान ६ टक्के तरी असावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तेव्हापासून निकाल ६ टक्क्यांवर गेला आहे. काहीही करुन निकाल सहा टक्के लावण्याबाबत शिक्षण तज्ज्ञांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली जात असतानाच आता सेटधारक बेरोजगारांचा आकडाही वाढू लागला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा घेतली जाते. २०१८ मध्ये घेतलेल्या परीक्षेत ६२,४०४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ४,०६८ म्हणजे ६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. २०१९ मधील परीक्षेस १,०२,५७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७९,८७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ५,४१६ म्हणजे ६.८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातही संरक्षण व सामरिकशास्त्र विषयाचा निकाल २०१८ मध्ये १७.१४ टक्के तर २०१८ मध्ये १६.७ टक्के लागला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू या भाषांचा व इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आदी विषयांचा निकाल ६ ते ९ टक्क्यांच्या दरम्यान लागला आहे.वर्षभर मेहनत करून ' सेट ' परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुढे काय करायचे असा प्रश्न आता पदवीधारकांसमोर उभारला आहेएखाद्या परीक्षेत किती विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत याबाबतचे धोरण निश्चित करून निकाल जाहीर करणे योग्य होणार नाही. त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नेट-सेट परीक्षांचा निकाल सहा टक्के लावण्याच्या निर्णयाचा पुनर्विचारझाला पाहिजे. - डॉ. अरूण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञप्राध्यापक पदासाठी कोणत्या आधारे आपण उमेदवाराची नियुक्ती करतो याचा विचार झाला पाहिजे. रिक्त जागा आणि उत्तीर्ण केले जाणारे उमेदवार याचा विचार केला जात नाही. नेट-सेटमधून आलेल्या शिक्षकांकडे दर्जा नसेल तर शिक्षणाचा दर्जा घसणार आहे. - प्रा.नंदकुमार निकम, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणे