Video: 'आता खरी दिवाळी साजरी होणार..' भारताच्या रोमहर्षक विजयानंतर पुणेकरांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 18:33 IST2022-10-23T18:31:51+5:302022-10-23T18:33:30+5:30
पुण्यात कोहली - कोहली अन् भारत मातेचा जयघोष

Video: 'आता खरी दिवाळी साजरी होणार..' भारताच्या रोमहर्षक विजयानंतर पुणेकरांचा जल्लोष
पुणे : भारत - पाकिस्तान टी ट्वेन्टी विषवचशक स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत भारताने रोमहर्षक विजयाचा इतिहास रचला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. सामन्यात एक ना एक चेंडू महत्वाचा होता. विराटच्या सुसाट बॅटने विजयाला भारताकडे ओढवून आणले. अखेर भारताने पाकिस्तानवर मात करून विजयाची पताका भारतीयांच्या मनात रोवली. त्यानंतर देशात सर्वत्र जलोष सुरु झाला. पुण्यातल्या गुडलक चौकात तरुणाईने भारत मात कि जय, वंदे मातरम चा जयघोष करत विजयी जल्लोष साजरा केला.
ऐन दिवाळीत भारताने मॅच जिंकल्यानंतर सर्वत्र फटाके वाजण्यास सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, उपनगरतही विजयाच्या उत्साहाचे वातावरण दिसून आले. अनेक रस्त्यांवरून तरुणाई हातात भारताचे झेंडे घेऊन घोषणा देत फिरताना दिसून आली. मॅच सुरु असताना मात्र रस्ते सामसूम झाले होते. मात्र विजयानंतर असंख्य नागरिक पुण्यातल्या प्रमुख रस्त्यांवर उतरले होते. आता खरी दिवाळी साजरी होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पुणेकरांनी दिली आहे.