शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

माझं शिवार बी होऊ दे आता आबादानी...!

By admin | Updated: June 13, 2017 03:55 IST

कर्जमाफीने पिचलेल्या आणि परिस्थितीने गांजलेल्या बळीराजाला सुखावणाऱ्या दोन गोष्टी एकाच दिवशी घडल्या. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कर्जमाफीने पिचलेल्या आणि परिस्थितीने गांजलेल्या बळीराजाला सुखावणाऱ्या दोन गोष्टी एकाच दिवशी घडल्या. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भावना जाणून घेत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याच वेळी त्याच्या शिवारात ‘मॉन्सून’चे आगमन झाले. सुखावलेल्या बळीराजाला आता पेरणीचे वेध लागले असून तो आता काळ््या मातीमध्ये रमणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पोशिंदा आंदोलनांमध्ये व्यस्त होता. स्वत:च पिकवलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून देताना आणि दूध ओतून देताना रोष व्यक्त करताना दिसत होता. पण त्या आंदोलनाला अखेरीस यश आले. शेतकऱ्यांच्या बुलंद आवाजापुढे शासनही नमले आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल, कर्जाच्या जोखडातून तो मुक्त होईल अशी आशा निर्माण झाली. त्याच्याच जोडीला त्याच्या शिवारात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दुहेरी आनंद झाला आहे. पुणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मॉन्सूनने हजेरी लावली होती. खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर, भोर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आणि शेती शिवारात सगळीकडे पाणी साठले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि योग्य वेळी पावसाचे आगमन झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी त्या आधी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. यावर्षी खरिप हंगामाच्या सुरूवातीलाच सुखदायक वातावरण निर्माण झाल्याने चांगल्या पिकपाण्याची आशा बळीराजाला आहे. पावसाने आणि सरकारने दिलेल्या या नवसंजीवनीमुळे नव्या दमाने आपले शिवार फुलवण्यास बळीराजा सज्ज झाला आहे. संपूर्ण हंगामात हे वातावरण कायम राहिल या आशेने जिल्ह्यात पुन्हा शेतीच्या कामात गुंतला आहे. माझं शिवार बी होऊ दे आबादानी अशी अपेक्षा बळी राजा व्यक्त करत आहे.