कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 14:03 IST2024-01-05T14:03:27+5:302024-01-05T14:03:47+5:30

- किरण शिंदे पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील ...

Notorious gangster Sharad Mohol shot dead in Kothrud; Hospital treatment started | कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

- किरण शिंदे

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली.

गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Web Title: Notorious gangster Sharad Mohol shot dead in Kothrud; Hospital treatment started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.