शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुख्यात गुंड शरद मोहोळच्या मारेकऱ्याची ओळख पटली; पाहा कोण आहे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 18:47 IST

शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला

किरण शिंदे

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. शरद मोहोळ आपल्या सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. अगदी जवळून त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यातील चार गोळ्या लागल्याने शरद मोहोळ गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणार्‍या एका आरोपीची ओळख पटली आहे.  साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांची पथके रवाना झाली आहे.

शरद मोहोळ हा सुतारदरा परिसरात राहण्यासाठी होता. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. त्यावेळी काही अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्याला तातडीने  खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान शरद मोहोळ याला रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. विश्वविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आहे. मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली. येरवडा कारागृहात शरद मोहोळने विवेक भालेराव याच्या साथीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागाचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळला जामीन मिळाला. मात्र बाहेर आल्यानंतर त्याची गुन्हेगारी कृत्य सुरुच होती. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसkothrudकोथरूडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू