शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज उत्खनन करणा-यांना नोटिसा

By admin | Updated: January 16, 2015 23:56 IST

अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी कोट्यवधी दंड वसुलीबाबतच्या नोटिसा बजावल्या असून

राजगुरुनगर : अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी कोट्यवधी दंड वसुलीबाबतच्या नोटिसा बजावल्या असून, दंड न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. महाळुंगे, कुरुळी, सोळू, गोलेगाव, आंबेठाण इत्यादी गावांच्या हद्दीत मुरूम, वाळू अशा गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन केल्याबद्दल या नोटिसा दिल्या आहेत. हे उत्खनन करणाऱ्यांमध्ये अनेक बड्या हस्ती आणि राजकीय लागेबांधे असलेल्या व्यक्ती आहेत. अनेक वर्षांपासून ही कारवाई प्रलंबित होती. ‘लोकमत’ने याबाबत बातम्याही केल्या होत्या. 'इनरकॉन' कंपनीलाही अशी नोटीस देण्यात आली आहे. वाढत्या उद्योगांसाठी आणि बांधकामांसाठी खेड तालुक्यात सर्रास टेकड्या फोडून खुलेआम मुरूम काढला जात आहे. प्रशासनाला याची पूर्ण कल्पना असूनही ठोस कारवाई केली जात नाही. तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला मुरूम उत्खनन चालू असताना प्रशासन मख्ख बसलेले असते. उत्खननाची प्रक्रिया चालू असताना या लोकांना कोणीही रोखत नाही. नंतर नोटिसा काढून दंड आकारणी केली जाते. पण अद्यापही किरकोळ अपवाद वगळता कोणीही दंड भरणा केलेला नाही. उलट या कारवाईला आव्हान देऊन वेळकाढूपणा केला जातो. दंड न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करता येते,मात्र अद्याप कोणावरही अशी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. (वार्ताहर)