शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवलेली नोटीस न्यायालयाने ठरवली वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 7:23 PM

पीडीएफ स्वरूपातील ही नोटीस व त्यासोबत पाठवलेला संदेश खातेदाराला मिळाला आणि त्यांनी पीडीएफ फाइल डाऊनलोड करून पाहिल्याचे इंडिकेटर्सवरून दिसत आहे.त्यामुळे.....

ठळक मुद्देखातेदार हे कंपनीच्या अधिका-यांचे दूरध्वनी कॉल घेण्यास आणि त्यांना भेटण्यासही टाळाटाळ व्हॉट्स अ‍ॅपवर नोटीस पाठवने बँकेच्या दृष्टीने सोयीस्कर होणार

पुणे : बँकेत प्रलंबित असलेल्या प्रकरणात ग्राहकाने नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ केल्यास त्याला थेट व्हॉट्अअ‍ॅपद्वारे पाठवलेली नोटीस आता ग्राह्य धरली जाणार असल्याची शक्यता आहे. व्हॉट्अअ‍ॅपद्वारे पाठवलेली नुकतीच एक नोटीस न्यायालयाने ग्राह्य धरली आहे.   स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) कार्ड्स अँड पेमेंट्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व एका खातेधारकाच्या वादा प्रकरणात खातेदार नोटीस स्वीकारणे टाळत होते. त्यामुळे कंपनीची व्हॉट्स अ‍ॅप नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरली आहे. न्यायालयीन प्रकरणांत असे क्वचितच घडते. त्यामुळे आता यापुढील काळात देखील अशा प्रकारच्या नोटीस वैध ठरविण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीच्या अर्जानुसार, एका वादासंदर्भात खातेदार हे कंपनीच्या अधिका-यांचे दूरध्वनी कॉल घेण्यास आणि त्यांना भेटण्यासही टाळाटाळ करत होते. त्यामुळे कंपनीच्या अधिका-याने त्यांना ८ जून रोजी व्हॉट्स अ‍ॅपवर पीडीएफ स्वरूपात नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीत खातेदारांना सुनावणीच्या पुढील तारखेची माहिती देण्यात आली होती. तरीही जाधव यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंपनीला उच्च न्यायालयात अर्ज करावा लागला. या अर्जावर न्या. गौतम पटेल यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर त्यांनी व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीने पाठवलेली नोटीस ग्राह्य धरली. अखेरीस आवश्यकता भासल्यास खातेदाराच्याविरुद्ध वॉरंट जारी करता यावे, यासाठी कंपनीने त्यांचा निवासी पत्ता सादर करावा, असे निर्देश देऊन खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.  दरम्यान प्रतिवादी खातेदार हे नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे कागदपत्रांमधून दिसत आहे. त्यामुळे कंपनीने व्हॉट्स अ‍ॅपवर नोटीस पाठवली. पीडीएफ स्वरूपातील ही नोटीस व त्यासोबत पाठवलेला संदेश खातेदाराला मिळाला आणि त्यांनी पीडीएफ फाइल डाऊनलोड करून पाहिल्याचे इंडिकेटर्सवरून दिसत आहे. त्यामुळे दिवाणी संहिता प्रक्रियेतील तरतुदींनुसार ही नोटीस ग्राह्य धरत आहे, असे न्यायमूर्तींनी आदेशात स्पष्ट केले आहे.          भाडेकराराच्या आधारे बँकेत खाते उघडण्याची सुविधा सध्या सर्वच बँकांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती या कराराच्या आधारे बँकेत खाते काढतात. त्यावेळी दिलेला पत्ता आणि मोबाइल नंबर कालांंतराने बदलतो. मात्र दरम्यानच्या काळात खातेदाराने कर्जाचे प्रकरण करून त्याची परतफेड करणे अशक्य झाल्यास खातेदाराला संपर्क करणे अवघड होते. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवर नोटीस पाठवने बँकेच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे.             

टॅग्स :PuneपुणेState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाWhatsAppव्हॉट्सअॅपCourtन्यायालय