शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पुणे लोकसभा निवडणुकीत '' नोटा ''चीही चलती : 11 हजार नोटाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 8:42 PM

पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणा-या ३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत ..

पुणे: पसंतीचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नसल्याने नन ऑफ द अबव्ह (नोटा)चा वापर करणा-या मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.पुणे लोकसभा मतदार संघात नोटा वापरणा-या मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. यंदा ११ हजार १ मतदारांनी नोटा वापरल्याने चांगलीच हवा निर्माण केली आहे. निवडणूक लढविणारा एकही उमेदवार पसंत नसले तर कोणत्याही उमेदवाराला मतदान न वरील नोटा वापरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणा-या ३१ उमेदवारांपैकी तीन उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत.पुण्याचे भाजपचे विजयी उमेदवार गिरीश बापट यांना ६ लाख ३२ हजार ८३५ ,क्राँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ३ लाख ८ हजार २०७ आणि वंचित आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना ६४ हजार ७९३ मते मिळाली आहेत. उर्वरित सर्व राजकीय पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांना दीड हजारापेक्षा अधिक मतांचा आकडाही गाठता आला नाही.या उलट नोटाला ११ हजार १ मते मिळाली आहेत.पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात नोटाचा वापर वाढला आहे.त्यात कोथरूड मतदार संघातील सर्वाधिक २ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी नोटा वापरला आहे.तसेच टपाली मतदानातही ४१८ मतदारांनी नोटाचा वापर केला.मावळ मतदार संघात गेल्या लोकसभा निवडणूकीत ११ हजार १७८ मतदारांनी नोटा वापरले तर यंदा १५ हजार ५१६ नोटाला पसंती दिली.मात्र,शिरूर व बारामती मतदार संघातील नोटा मतदारांची संख्या मागील निवडणूकीच्या तुलनेत काही प्रमाणात घटली आहे.------------------   पुणे लोकसभा मतदार संघातील नोटाचा वापर करणा-या मतदारांची आकडेवारी मतदारसंघाचे नाव     २०१४ चे नोटा मतदार        २०१४ चे नोटा मतदार वडगावशेरी                   ११९८                                  २०८९        शिवाजींनगर                १०४८                                   १५५२कोथरूड                       ११२९                                   २३०७पर्वती                          १०१६                                  १८६५पुणे कॅन्टोन्मेंट             ९५१                                   १३२८कसबा                         ११०१                                 १८३१------------------------------------------------------------------ एकूण                       ५,३१४                  ११,००१

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालpune-pcपुणे