Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 20:57 IST2025-03-14T20:53:10+5:302025-03-14T20:57:44+5:30
लाठी चार्जसारखा कुठलाही प्रकार घडला नसून गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आहे

Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण
पुणे : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मी लॉन्स येथे होळी आणि धुलवडीनिमित्त गायक हनी सिंग याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान नियोजनापेक्षा अधिक गर्दी झाल्याने पोलिसांना या ठिकाणी सौम्य बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिसांनी रसिकांना पुढे व्हायला सांगत गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून लाठीचार्ज होत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत, यावेळी केवळ पोलिसांनी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
हनी सिंगच्या कार्यक्रमापूर्वीच पोलिसांकडून गर्दीला आवरण्यासाठी सौम्य बळाचा वापर करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला होता. गर्दी न आवरल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा मेसेज समाजमाध्यमांवर पसरला. त्याबाबत खुलासा करत पोलिसांनी लाठीचार्ज न झाल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. यावेळी गर्दीला आवरताना पुणे पोलीस हतबल झाले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला होता. लाठीचार्जसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्टीकरण जाधव यांनी यावेळी दिले.
हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण#Pune#honeysing#Holi#Policepic.twitter.com/4ZIDQvTVE4
— Lokmat (@lokmat) March 14, 2025
व्हिडिओमध्ये काय दिसते आहे
हनी सिंगच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे व्हिडिओत दिसते आहे. असंख्य तरुण तरुणी उत्साहात या कॉन्सर्टसाठी आले आहेत. तेव्हा एंट्री गेटवरच गर्दीला आवर घालताना पोलिसांना अवघड झाल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी एक पोलीस गर्दीला पांगवण्यासाठी १, २ जणांना काठी मारताना दिसून आला आहे. या घटनेला पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केल्याचे सांगितले आहे.