पेट्रोल डालने के लिए पैसे नही, तू क्या तेरी औरत को संभालेगा? मित्रावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 20:54 IST2021-06-03T20:47:12+5:302021-06-03T20:54:06+5:30

रागाच्या भरात मित्रावर चाकू हल्ला करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न 

‘No money to for petrol, will you handle your women’; half murder on a friend | पेट्रोल डालने के लिए पैसे नही, तू क्या तेरी औरत को संभालेगा? मित्रावर प्राणघातक हल्ला

पेट्रोल डालने के लिए पैसे नही, तू क्या तेरी औरत को संभालेगा? मित्रावर प्राणघातक हल्ला

पुणे : पेट्रोल भरण्यासाठी पैसे मागितल्यावर औकात काढल्याने चिडलेल्या तरुणाने मित्रावर चाकूने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

समर्थ पोलिसांनी फजल अब्दुल रशिद मुल्ला (रा. ब्रम्हा इस्टेटमागे, कोंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फैजान अब्दुलगफूर शेख (वय २५, रा. नुराणी कब्रस्थानमागे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना भवानी पेठेत बुधवारी पहाटे साडेचार वाजता घडली. 

फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. भवानी पेठेत पहाटे दोघे आले असताना आरोपीच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने त्याने फिर्यादीकडे पैसे मागितले. तेव्हा फिर्यादीने ‘‘ऐ तेरी औकात है क्या, तेरे पास गाडी मे पेट्रोल डालने के लिए पैसे नही और तु क्या तेरी औरत को संभालेगा’’असे म्हटले. त्यावरुन चिडलेल्या आरोपीने ‘‘मै तुझे अभी जिंदा नही छोडुंगा’’ असे म्हणून त्याच्याकडील चाकूने फिर्यादीच्या मानेवर वार करुन जबर जखमी केले. समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: ‘No money to for petrol, will you handle your women’; half murder on a friend