कोणताही मंत्री येणार नाही; स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळावी, रवींद्र चव्हाणांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:30 IST2026-02-03T16:25:19+5:302026-02-03T16:30:53+5:30

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमांतून झालेली विविध विकासकामे आणि शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

No minister will come; local workers should take charge of the campaign, Ravindra Chavan's instructions | कोणताही मंत्री येणार नाही; स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळावी, रवींद्र चव्हाणांच्या सूचना

कोणताही मंत्री येणार नाही; स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळावी, रवींद्र चव्हाणांच्या सूचना

पुणे : घरोघरी जाऊन प्रचार करा, छोट्या बैठका व मेळाव्यांवर भर द्या, स्थानिक पातळीवर प्रचार करा, अशा सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना केल्या आहेत.

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, पुणे दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे उपस्थिती होती. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

चव्हाण म्हणाले, प्रदेश स्तरावरील कोणताही मंत्री किंवा पदाधिकारी प्रचारासाठी येणार नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमांतून झालेली विविध विकासकामे आणि शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपची बूथ यंत्रणा सक्षम असून, त्या माध्यमातून प्रचार यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची मेहनत आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचार यामुळे पक्षाला मोठे यश मिळेल.

Web Title : कोई मंत्री प्रचार के लिए नहीं; स्थानीय कार्यकर्ता नेतृत्व करें: रवींद्र चव्हाण

Web Summary : पुणे जिला परिषद चुनावों के लिए रवींद्र चव्हाण ने भाजपा कार्यकर्ताओं को स्थानीय स्तर पर प्रचार करने का निर्देश दिया। उन्होंने केंद्र और राज्य सरकार की योजनाओं के लाभार्थियों तक पहुंचने पर जोर दिया। कोई मंत्री शामिल नहीं होगा; स्थानीय कार्यकर्ता अभियान संभालेंगे। चंद्रकांत पाटिल के अनुसार, भाजपा का लक्ष्य विकास और मजबूत संगठन के आधार पर जीत हासिल करना है।

Web Title : No Ministers for Campaigning; Local Workers to Lead: Ravindra Chavan

Web Summary : Ravindra Chavan instructed BJP officials to focus on local campaigning for Pune Zilla Parishad elections. He emphasized reaching beneficiaries of central and state government schemes. No ministers will be involved; local workers will handle the campaign. BJP aims for victory based on development and strong organization, according to Chandrakant Patil.