शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

By admin | Updated: January 26, 2017 01:02 IST

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पोलीस आयुक्तालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पोलीस आयुक्तालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये यंदा मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. या उमेदवारी अर्जासोबत पोलीस आयुक्तालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागणार असल्याचे अफवा इच्छुकांमध्ये पसरली होती. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी दोन दिवसांपासून इच्छुकांची मोठी गर्दी उसळली होती. अचानक मोठ्या संख्येने यासाठी अर्ज आल्याने इतक्या जणांना अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कसे उपलब्ध करून द्यायचे, असा प्रश्न पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाला होता. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.