शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आळंदी संस्थांनचे विश्वस्त निरंजन नाथ यांची पोलीस अन् माध्यमांशी अरेरावी; भाविकांशीही उद्धटपणे वर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:20 IST

पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात पालखी आल्यानंतर निरंजन नाथ यांनी वारकरी, पोलिसांसोबतची अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. २०) शहरात दाखल झाला. आज दोन्ही पालख्या शहरात मुक्कामी आहेत. या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी, तसेच भाविकांचा शहरात मुक्काम आहे. यासाठी पुणेपोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी आहे. या मंदिरात काल वारकरी, पोलिसांसोबत अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

आळंदी संस्थांनचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे. त्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर कासेकर हे उद्धटपणे वर्तन करताना दिसत आहेत. पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसत आहेत. त्यांच्या या वाईट वागणुकीचा सगळ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पालखी भवानी पेठेत असताना हजारो भाविक, वारकरी तेथे उपस्थित असतात. पोलिसांना याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा लागतो. त्यामुळे त्यांनाही आतमध्ये थांबावे लागते. परंतु कासेकर यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांवरच अरेरावी केल्याचे व्हिडिओतून दिसते आहे. 

आम्ही संबंधितांशी चर्चा करू 

पुण्यात पालखी मुक्कामी आल्यानंतर घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा दखल घेतली आहे. पालखी सोहळा आनंद, उत्साह, शांतता अन् आनंद देणारा सोहळा आहे. अशा घटना अजिबात घडू नये. आम्ही संबंधित विश्वस्त यांच्याशी चर्चा करू. असं इथून पुढे होणार नाही याचीही काळजी घेण्यास सांगू  असं ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025PoliceपोलिसPandharpurपंढरपूरTempleमंदिर