धक्कादायक! सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 09:49 IST2020-01-10T09:47:53+5:302020-01-10T09:49:15+5:30

दरोड्याच्या गुन्ह्यातून नुकताच सुटून आलेल्या सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

nilesh shedge murder in pune | धक्कादायक! सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या

धक्कादायक! सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या

पुणे - दरोड्याच्या गुन्ह्यातून नुकताच सुटून आलेल्या सराईत गुन्हेगाराची डोक्यात फरशी घालून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निलेश ऊर्फ गोट्या विठ्ठल शेडगे (वय २२, रा. दरोडे वस्ती) असे हत्या झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, निलेश शेडगे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. तो पंधरा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहातून जामीनावर सुटून बाहेर आला होता. निलेशला दारुचे व्यसन आहे. कोरेगाव पार्क परिसरातील दरोडे वस्तीत गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याचे आणि वस्तीमधील काही मुलांशी वादविवाद झाला. त्यातून ३ ते ४ जणांनी त्याला मारहाण केली व त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत गुन्हेगार पळून गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी पहाटे दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. हत्येमागचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.
 

Web Title: nilesh shedge murder in pune