Pune Crime: घायवळच्या गुंडांकडून केवळ गोळीबार नाही तर आणखी एकावर कोयत्याने हल्ला; पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:24 IST2025-09-18T12:23:42+5:302025-09-18T12:24:44+5:30
Pune Crime News: निलेश घायवळच्या गुंडांनी 'आम्ही इथले भाई आहोत' अशी दहशत निर्माण करत एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला

Pune Crime: घायवळच्या गुंडांकडून केवळ गोळीबार नाही तर आणखी एकावर कोयत्याने हल्ला; पोलिसांची माहिती
पुणे : पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून कोथरूड भागात मुठेश्वर मित्र मंडळासमोर मध्यरात्री ही घटना घडली. प्रकाश धुमाळ (वय ३६) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आजून एकावर कोयत्याने हल्ला केल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
कदम म्हणाले, ही घटना काल रात्री कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी केवळ गोळीबार नाही केला तर अजून एकाला कोयत्याने मारहाण देखील केली आहे. काल रात्री या आरोपींनी दोन जणांना मारहाण केली आहे. काल रात्री १२ च्या दरम्यान गोळीबार घडला आणि त्यानंतर याच आरोपींनी अजून एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली आहे
प्रकाश धुमाळ अस गोळीबार झाल्याचं नाव आहे. तर वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली. चार आरोपी दोन गाड्यांवर आले आणि गोळीबार केला. आम्ही इथले भाई आहोत म्हणत गोळीबार केला. एक गोळी फायर केली होती आणि ती त्या इसमाच्या मांडीवर लागली. याच आरोपींनी रात्री अजुन एकाला कोयत्याने मारत जखमी केल आहे. हे सगळे घायवळ टोळीचे आरोपी आहेत. हे सगळे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत काल रात्री २ गुन्हे यांच्यावर दाखल केले आहेत..अनेक मोका आणि ३०७ या आरोपींवर याआधी दाखल आहेत. निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. मयूर कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल असून यांना ताब्यात घेतले आहेत.
प्रकाश धुमाळ हा काल रात्री मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी दुचाकीला साईड न दिल्यामुळे या घायवळच्या टोळीतील लोकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला. मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या. यात प्रकाश धुमाळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली. गोळ्या लागल्यानंतर प्रकाश तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्याच वेळी वैभव साठेवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. आता दोघांवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत.