शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नेटबँकिंगने औषधविक्रेत्यांना गंडविले

By admin | Updated: January 8, 2015 23:07 IST

नववर्षाच्या प्रारंभीच नेटबँकिंगच्या माध्यमातून जुन्नरकर नागरिकांना आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न सायबर चाचांनी केला आहे.

लेण्याद्री : नववर्षाच्या प्रारंभीच नेटबँकिंगच्या माध्यमातून जुन्नरकर नागरिकांना आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न सायबर चाचांनी केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांना त्यांच्या एटीएम कार्डच्या रजिस्ट्रेशनचा बहाणा करून बोलण्यात गुंतवून पिन नंबर काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारची विचारणा मोबाईल फोनच्या माध्यमातून जुन्नरमधील जवळपास २० ते २५ जणांना करण्यात आली, तर अनवधनाने एटीएम कार्डचा पिन नंबर सांगून टाकणाऱ्या एका औषधविक्रेत्यांला ९ हजार रुपयांचा फटका बसला.कॅनरा बँकेच्या जयपूर येथील वरिष्ठ कार्यालयातून बोलत असल्याचा फोन या औषधविक्रेत्याला आला. तुमच्या एटीएम कार्डचे रजिस्ट्रेशन बँकेने रद्द केले असून, त्या संदर्भात पिन नंबरची विचारणा त्यांना करण्यात आली. या औषधविक्रेत्याने नुकतेच महिनाभरापूर्वीच बँकेचे एटीएम कार्ड काढले होते. पिन नंबर विचारला असता, सावधपणे औषधविक्रेत्याने फोन करणाऱ्या व्यक्तीला पिन नंबर सांगण्यास नकार दिला. यानंतर ‘एटीएमच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही २२२२ नंबर घ्या, त्यात ५४४७ नंबर मिळवा, त्यानंतर मग तुमचा पिन नंबर टाका व एकत्रित बेरीज करून आम्हाला सांगा,’ असे औषधविक्रेत्याला सांगण्यात आले. त्याने वरील दोन संख्या व पिन नंबरच्या संख्येची बेरीज करून फोनकर्त्याला सांगितली. परंतु, यानंतर मात्र लगेचच एकूण सांगितलेल्या बेरजेतून फोनकर्त्यांनी सांगितलेली संख्या वजा केल्यास पिन नंबर मिळणार असल्याचे या औषधविक्रेत्याच्या लक्षत आले. हा धोका लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब १० मिनिटांत बँकेच्या स्थानिक शाखेत धाव घेतली व झालेला प्रकार कथन करून त्यांचे खाते ब्लॉक करण्याची सूचना बँकेच्या कर्मचाऱ्याला केली; परंतु खाते ब्लॉक करेपर्यंतच्या कालावधीत नेटबँकिंगच्या माध्यमातून त्याच्या खात्यावरील ९ हजार रुपये काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्याने सदर खाते ब्लॉक केले. या खात्यात जवळपास ७५ हजार रुपये शिल्लक होते. त्यानंतरदेखील दिवसभरात या औषधविक्रेत्याच्या घरातील व्यक्तींच्या मोबाईलवर अशाच प्रकारचे एटीएमसंदर्भात फोन आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच या औषधविक्रेत्याला ‘तुम्ही एटीएम कार्ड बंद केला का?’ असा फोन आला होता. तर, दिवसभरात जुन्नर शहरातील जवळपास २० ते २५ जणांना अशा प्रकारचे फोन करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या औषधविक्रेत्याचा अपवाद वगळता कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. नेटबँकिंगच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याने बँकेच्या स्थानिक शाखेने वरिष्ठ कार्यालयाकडे याची माहिती दिल्याचे या औषधविक्रेत्याने सांगितले.४दिवसभरात जुन्नर शहरातील जवळपास २० ते २५ जणांना अशा प्रकारचे फोन करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या औषधविक्रेत्याचा अपवाद वगळता कोणीही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही.