शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनातील नकारात्मक भावना होणार दूर; सशक्त आणि विश्वासाने जगता येण्यासाठी पुण्यात ’रेप क्रायसिस' सेंटर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 20:06 IST

बलात्कारासह जगणा-यांना त्यांचे दु:ख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ’सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे,

ठळक मुद्देप्रशिक्षित व्यक्तीद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून मानसिकदृष्ट्या मजबूत करणार

 पुणे : प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. बलात्कारातून सावरणा-या स्त्रियांना कायदेविषयक मदत देण्यातून अशा माणुसकीविरोधी गुन्हयांना केवळ प्रतिबंधच होणार नाही तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना सशक्तपणे व विश्वासाने जगण्यासाठी सहकार्य करण्याच्या उददेशाने सहयोग ट्रस्टतर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरु करण्यात आले आहे. बलात्कारासह जगणा-यांना त्यांचे दु:ख व समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षितजागा म्हणून ’सपोर्ट ग्रुप’ चालविण्यात येणार आहे. 

सहयोग ट्रस्टच्या सचिव अँड. रमा सरोदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सुरेखा दास , रेश्मा गोखले, गौरांगी ताजणे, अँड.अजित देशपांडे, अँड.अक्षय देसाई, शार्दुल सहारे, तृणाल टोणपे यावेळी उपस्थित होते.

सरोदे म्हणाल्या, ज्या महिलांवर लैगिंक अत्याचार झालेले असतात. त्यांनी जणू काही स्वत:च चूक केली आहे असा दबाव घेऊन त्या जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातील ताणतणाव एकमेकांसोबत संवाद साधण्यातून कमी करण्याचा प्रयत्न हा सपोर्ट ग्रृप करणार आहे. मायग्रोथ झोन ही कंपनी न्युरोलिंगविस्टिक तंत्रावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तीद्वारे बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत करण्यात येणार आहे. मायग्रोथ झोनसोबत सहयोग ट्रस्ट सहका-याच्या भावनेतून बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले व आपलीच चूक आहे, अशी स्वत:लाच दोष देणारी भावना, मनातील भीती, राग या संदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार आहे. 

''एकीकडे बलात्काराचे प्रमाण कमी होत असताना दुसरीकडे शिक्षा होण्याचे प्रमाणही नगण्य असल्याने बलात्काराशी लढणा-या स्त्रियांना नैराश्य येते. दरम्यान, बलात्कारग्रस्त स्त्रिया, त्यांची मुले व परिवार यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम तुणाल टोणपे करणार आहेत.असं सुरेखा दास यांनी सांगितलं.'' 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार

- २०१९ साली देशात बलात्काराच्या ३२, ५५९ घटना-  दररोज ८८ बलात्कार होतात-  राज्यात २०१९ साली बलात्काराचे २,२९९ गुन्हे

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ