शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज : तेजस्वी सातपुते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 12:13 IST

कायद्याने मुलींना संरक्षण बहाल केले आहे. त्याचा उपयोग करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे.

ठळक मुद्देलोक काय म्हणतील ही भीती मनातून काढून टाका : महिला सक्षमीकरण कार्यशाळा 

पुणे : आर्थिक परिस्थिती चांगली म्हणजे महिला सक्षम आहे, असे नाही. चांगले शिक्षण घेऊन स्वत:ला घडवणे गरजेचे असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी शिक्षण आणि ज्ञानाची गरज आहे. कायद्याविषयी जाणून घेत योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. कोणाला त्रास देण्याच्या हेतूने कायद्याकडे बघू नये. मात्र, लैंगिक अत्याचाराला बळी न पडता तात्काळ आवाज उठवण्याची हिंमत महिलांनी बाळगावी, असे मत पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विद्यार्थिनींना दिला.येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या महिला विकास केंद्रातर्फे संस्थेतील विद्यार्थिनींसाठी महिला सक्षमीकरण व वाहतूक जनजागृती या विषयावर आयोजित कार्यशाळेत सातपुते बोलत होत्या. यावेळी कोंढवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सी. एम. निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, कार्यशाळेचे समन्वयक व प्राचार्य डॉ. सुहास खोत, महिला विकास केंद्राच्या प्रमुख प्रा. अमृता ताकवले, प्रा. रोहिणी आगवणे, प्रा. ऋतुजा मोरे, प्रा. पूजा चौधरी आदी उपस्थित होते.       सातपुते म्हणाले, कायद्याने मुलींना संरक्षण बहाल केले आहे. त्याचा उपयोग करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपणकर्तव्यांचे पालन करावे . लोक काय म्हणतील ही भीती मनातून काढून टाकून स्वत:ला घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. अडचणीच्या वेळी पोलीस काका, विशाखा समिती, बडी कॉपची मदत घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळण्यासोबतच हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केला पाहिजे. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्यार्थिनींना हेल्मेट वाटप करण्यात आले. सीएम निंबाळकर, डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. सुहास खोत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्राजक्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमृता ताकवले यांनी आभार मानले.

 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस