शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

एनडीए केवळ लष्करी अधिकारी नाही, तर जबाबदार व्यक्ती घडवतात - राज्यपाल व्ही.के.सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:03 IST

सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश सुरक्षा यांसारख्या नव्या क्षेत्रात बौद्धिकदृष्ट्या तल्लख आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक

पुणे : आजचा दिवस ऐतिहासिक असून या परेडमध्ये प्रथमच महिलांच्या १७ छात्रांचा समावेश झाला. ऐतिहासिक घटनेमुळे ‘एनडीए’च्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू झाले आहे. आजचा दिवस ‘एनडीए’साठी केवळ एक परेड नाही, तर लष्करी नेतृत्वाच्या गौरवशाली इतिहासातील एक नवा अध्याय आहे. एनडीएमध्ये ज्याप्रकारे प्रशिक्षण दिले जाते ते केवळ लष्करी अधिकारी नाही, तर जबाबदार व्यक्ती बनवते. अनेक शूरवीर सैनिकांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे, असे प्रतिपादन माजी लष्करप्रमुख आणि मिझोरमचे राज्यपाल जनरल व्ही.के.सिंग यांनी केले.

एनडीएच्या खेत्रपाल मैदानावर पासिंग आऊट परेड दिमाखदार वातावरणात शुक्रवारी (दि.३०) पार पडला. यावेळी सिंग बोलत होते. दरम्यान अकादमी कॅडेट कॅप्टन उदयवीर सिंग नेगीने अत्यंत आत्मविश्वासाने संपूर्ण संचलनाचं नेतृत्व केलं. यावेळी माजी लष्करप्रमुख आणि मिझोरमचे राज्यपाल (निवृत्त) जनरल विजय कुमार सिंग , एअर व्हाइस मार्शल सरताज बेदी, एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल गुरुचरणसिंह, चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित, दक्षिण मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडन्ट लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आदी उपस्थित होते.

सिंग म्हणाले, शारीरिक, मानसिकदृष्ट्या कणखर राहणे महत्त्वाचे आहे. आजच्या अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यानुसार आपली आगामी काळात रणनीती आखावी कारण देशाचे भविष्य तुम्ही आहे. नवीन तंत्रज्ञान अभ्यास करून त्यात पारंगत व्हा. कारण त्यानुसारच पुढील कारवाई अवलंबून आहे. सायबर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश सुरक्षा यांसारख्या नव्या क्षेत्रात बौद्धिकदृष्ट्या तल्लख आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. हिमालयाच्या शिखरांपासून ते अवकाशाच्या सीमांपर्यंत तुमच्या खांद्यावरच देशाचे रक्षण अवलंबून आहे.

पासिंग आऊट परेडमध्ये मित्र देशातील कॅडेट्सचा सहभाग 

परेडमध्ये एकूण १३४१ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यापैकी ३३६ कॅडेट्स हे उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये थल सेना कॅडेट्स, नौदल कॅडेट्स आणि हवाईदल कॅडेट्सचा समावेश होता. तसेच मित्र देशातील भूतान, ताजिकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, मलेशिया, सुदान, टांझानिया, केनिया, झांबिया आणि मालदीव या देशातील कॅडेट्सचा समावेश होता. तर सध्या तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या प्रशिक्षण कालावधीत असलेल्या महिला कॅडेट्सच्या तुकडीनेही परेडमध्ये भाग घेतला.

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थीEducationशिक्षणSocialसामाजिकWomenमहिला