शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:24 IST

फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे आता कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के कोट्यातून लाटलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्यात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी अंतिम सुनावणीत दोषी धरले. फेब्रुवारीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे आता कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या

मंत्री माणिकराव कोकाटे आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये त्यांच्या मंत्रि‍पदाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याआधीही वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकाटे चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी कृषी खाते त्यांच्याकडे होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जावरुन मोठं विधान केले होते. यावेळीही त्यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. 

तर मागील अधिवेशनावेळी माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी विरोधकांनी राजिनाम्याची मागणी केली होती. यावेळी त्यांच्याकडून कृषी खाते काढून त्यांना क्रीडा खाते दिले होते. दरम्यान, आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने नैतिकतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यामुळे आता त्यांचे मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.  

आज मुंबईमध्ये मंत्री कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मंत्रिपदाबाबत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Manikrao Kokate's Minister Post in Jeopardy? Meeting with Ajit Pawar Today.

Web Summary : Manikrao Kokate's ministerial position is threatened after being convicted in a housing scam. A court upheld his sentence. He will meet with Ajit Pawar today, fueling speculation about his resignation. Past controversies, including remarks on farmer loans and a video of him playing online rummy, have also put pressure on him.
टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेAjit Pawarअजित पवार