शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा

By admin | Updated: August 14, 2015 03:15 IST

‘‘तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीसमर्थकांचा वरचष्मा राहिला. जवळपास ३५ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आल्या आहेत

दौंड : ‘‘तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीसमर्थकांचा वरचष्मा राहिला. जवळपास ३५ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आल्या आहेत. सरपंच-उपसरपंच निवडीनंतर जवळपास ४० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील,’’ असा विश्वास माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केला.खुटबाव (ता. दौंड) येथील माजी उपसरपंच शरद शेलार यांची दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे त्यांना दौंड येथे निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. थोरात म्हणाले, ‘‘सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यातही राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहील. ज्या कार्यकर्त्यांना नव्याने राष्ट्रवादीने पदे दिली, अशा कार्यकर्त्यांनी पदाचा गैरवापर न करता पक्ष वाढविण्यासाठी मदत करावी. दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब ढमढेरे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माऊली चव्हाण, सुभाष नागवे, उत्तम आटोळे, तात्यासाहेब टुले, जी. के. थोरात आणि मान्यवर उपस्थित होते.