पुण्यात राष्ट्रवादीच्या महिलांनी घातले गॅस टाकीचे श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:08 IST2021-10-08T17:03:49+5:302021-10-08T17:08:30+5:30

पुण्यातील लोकमान्य टिळक चौकात स्वयंपाकाच्या गॅस टाकीचे श्राद्ध घालून केंद्र सरकारचा निषेध केला

ncp women movement oppose central government in pune | पुण्यात राष्ट्रवादीच्या महिलांनी घातले गॅस टाकीचे श्राद्ध

पुण्यात राष्ट्रवादीच्या महिलांनी घातले गॅस टाकीचे श्राद्ध

ठळक मुद्देगॅस सिलेंडरचे वाढत्या दराने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर शाखने लोकमान्य टिळक चौकात स्वयंपाकाच्या गँस टाकीचे श्राद्ध घालून केंद्र सरकारचा निषेध केला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर सहभागी झाले होते.

चाकणकर म्हणाल्या,वाढत्या महागाईविरोधात आंदोलन करून मोदी सरकार सत्तेवर आले. आता तेच महागाईचा भस्मासूर जोपासत आहेत. गँस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करत आहेत. जगताप यांनीही यावेळी मोदी सरकारवर टीका केली. सर्वच आघाड्यांवर सरकारचे अपयश सातत्याने समोर येते आहे असे ते म्हणाले. टिळक चौकात ठिय्या देऊन महिलांनी मोदी विरोधात घोषणा दिल्या. शहराध्यक्ष मृणालिनी वाणी व महिला कार्यकर्त्या यात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: ncp women movement oppose central government in pune