दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची बाजी, पंचायत समितीत भाजप विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 21:19 IST2026-02-09T21:19:05+5:302026-02-09T21:19:36+5:30

दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी निकालानंतर एकच जल्लोष केला.

NCP wins in Daund Zilla Parishad group, BJP wins in Panchayat Samiti | दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची बाजी, पंचायत समितीत भाजप विजयी 

दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची बाजी, पंचायत समितीत भाजप विजयी 

दौंड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीने (अजित पवार) सात पैकी सहा जागा जिंकून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्विवादपणे विजय मिळवला तर पंचायत समिती गणात १४ पैकी आठ जागांवर भाजपने विजय मिळवला. दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी निकालानंतर एकच जल्लोष केला.

जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे -
राहू - खामगाव : सागर शेलार (राष्ट्रवादी), वरवंड - नानगाव : गायत्री खळदकर (१५१७६) ( राष्ट्रवादी), गोपाळवाडी - खामगाव : साहेबराव पोळ(१०६८१) (राष्ट्रवादी), खडकी -देऊळगावराजे : वीरधवल जगदाळे(४७११) ( राष्ट्रवादी), पाटस-- कुरकुंभ : अनुराधा शितोळे (१३४३०) (राष्ट्रवादी), बोरीपार्धी -केडगाव: तुषार थोरात (१४७७७)  (राष्ट्रवादी), यवत - बोरीभडक: अविनाश कुदळे  (१२७०५)(भाजपा), 

दौंड पंचायत समिती गणासाठी विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे. 
राहू : शुभांगी शिंदे (भाजपा), यवत : तेजस्विनी पडळकर  (भाजपा), बोरीपार्धी : रेखा चौधरी  (भाजपा), देऊळगावराजे : अमृता गिरमकर (भाजपा), कुरकुंभ : राहुल भोसले (भाजपा), गोपाळवाडी : सुमन निकाळजे(भाजपा), खामगाव : सुखदेव चोरमले(भाजपा), बोरीभडक : साक्षी मस्के (भाजपा)   केडगाव : धनंजय शेळके (राष्ट्रवादी ), खडकी : संजय भोसले (राष्ट्रवादी), खामगाव : सुखदेव चोरमले (राष्ट्रवादी), कानगाव : बाळासाहेब निंवगुणे (राष्ट्रवादी), पारगाव : मनीषा ताकवणे (राष्ट्रवादी), वरवंड : प्रदीप दिवेकर (राष्ट्रवादी). 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रेवणनाथ लबडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण शेलार यांनी काम पाहिले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत यश मिळालं तर पंचायत समितीत भाजपाला यश मिळाला आहे तेव्हा आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांना चिंतन करणारी बाब आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राहुल कुल समर्थक पॅनलला जिल्हा परिषदेला एक जागा तर पंचायत समितीला एक जागा मिळाली होती मात्र यावेळी जिल्हा परिषदेला भाजपला एक जागा मिळाली तर  पंचायत समितीत आठ जागा मिळाल्याने भाजपाच्या सात जागा वाढल्या आहेत.

दरम्यान आमदार राहुल कुल यांना स्वतःच्या हक्काच्या राहू गटातील उमेदवाराचा  पराभव झाल्याने  ही बाब राजकीय दृष्ट्या राहुल कुलांना आत्मपरीक्षण करणारी आहे. तसेच जिल्हा परिषदेत इतर सहा गटात राहुल कुल यांच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले हे देखील त्यांच्या दृष्टिकोनातून चिंतनाची बाब आहे  माजी आमदार रमेश थोरात  यांनी स्वतःच्या मतदारसंघात त्यांचे चिरंजीव तुषार थोरात यांना आघाडीचे मत घेऊन विजय मिळवल्याने रमेश थोरात यांनी स्वतःच्या गटावर वर्चस्व ठेवले आहे. तसेच पंचायत समितीला पराभवला सामोरे जावे लागल्यामुळे रमेश थोरात यांनी देखील आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

वैशाली नागवडे यांचे ठिया आंदोलन -
यवत -बोरीभडक  गटासाठी फेर मतमोजणी करण्यात यावी म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर ठिय्या आंदोलन केली होते. यावेळी काही काळ शांततापूर्ण तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली मात्र फेर मतमोजणी झाली नसल्याची वस्तुस्थिती होती.

Web Title : दौंड जिला परिषद में राकांपा का दबदबा, पंचायत समिति में भाजपा विजयी

Web Summary : दौंड जिला परिषद में राकांपा ने बहुमत प्राप्त किया। पंचायत समिति चुनाव में भाजपा विजयी रही। मिश्रित परिणामों के बाद प्रमुख नेताओं के लिए आत्मनिरीक्षण के साथ परिणाम के बाद जश्न मनाया गया।

Web Title : NCP Dominates Daund Zilla Parishad, BJP Wins Panchayat Samiti

Web Summary : NCP secured a majority in Daund Zilla Parishad. BJP triumphed in Panchayat Samiti elections. Celebrations erupted post-results, prompting introspection for key leaders after mixed outcomes.