राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:05 IST2025-05-22T10:05:01+5:302025-05-22T10:05:52+5:30

Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात पक्षाने मोठी कारवाई केली आहे.

NCP takes action against Rajendra Hagavane expelled from the party, Ajit Pawar orders action in Vaishnavi Hagavane death case | राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश

राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश

Vaishnavi Hagawane : पिंपरी येथील २३ वर्षीय विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असून, आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. वैष्णवीच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला. दरम्यान, आता वैष्णवी हगवणे हिचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात पक्षाने कारवाई केली आहे. पक्षाने त्यांना बडतर्फ केले आहे.

ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं

राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष, सुरज चव्हाण यांनी दिली . यावेळी बोलताना सुरज चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांचे पुणे सीपी यांच्यासोबत बोलणे झाले आहे. अजित पवारांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. अजित पवार नेहमी दोषींवर कारवाई करा असं म्हणतात,  मग तो कोणत्याही पक्षाचा असो. याही प्रकरणात दोषींवर कारवाई होईल, असंही सुरज चव्हाण म्हणाले.

अजित पवारांनी कारवाईचे निर्देश दिले

"राजेंद्र हगवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. अजित पवारांनी अनेक सभांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला होता, माझा कोणताही कार्यकर्ता चुकीचा वागला तर त्याला टायरमध्ये घेऊन मारावा अशा पद्धतीच्या सूचना अजित दादांनी वारंवार सभेमध्ये दिलेल्या आहेत.  हगवणे प्रकरणांमध्ये सुद्धा अजितदादांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत, माध्यमांना माझी विनंती आहे, या प्रकरणाला पक्षीय रूप न देता याला  न्यायाच्या भूमिकेतून पहावे, असंही सुरज चव्हाण म्हणाले.

२६ मे पर्यंत पोलिस कोठडी 

जमीन खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केल्यानंतर ते पैसे न दिल्याने वैष्णवीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या पती, सासू व नणंद यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ करत २६ मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title: NCP takes action against Rajendra Hagavane expelled from the party, Ajit Pawar orders action in Vaishnavi Hagavane death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.